शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येत पार पडला भव्य दीपोत्सव, एकाचवेळी २५ लाख दिवे प्रज्वलित झाले, गिनीज बुकमध्ये झाली नोंद
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शिवसेनेचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं'; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
5
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
6
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
7
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
8
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
9
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
10
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

विटंबनेनंतर बसवला शिवरायांचा नवा पुतळा; करासवाडा येथे तणावपूर्ण शांतता 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 11:00 AM

दोघेजण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: करासवाडा येथील थिवी औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रविवारी मध्यरात्री विटंबना करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच शिवप्रेमी मोठचा संख्येने जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शिवप्रेमी, पोलिसांत झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी छत्रपतींच्या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांना ताब्यात घेत असताना शिवप्रेमींनी त्या दोघांना बदल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी कळंगूट येथील पुतळ्यावरून शिवप्रेमी व पंचायती मोठा वाद निर्माण झाला होता. या विषय विधानसभा अधिवेशनातही उपस्थित झाला होता. हा वाद शमतोय तोपर्यंत रविवारी मध्यरात्री करासवाडा येथील शिवरायांच्या पुतळ्याची अज्ञाताकडून विटंबना करण्याता आली. घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमी स्वराज्य गोमंतकचे कार्यकर्ते प्रशांत वाळके, अमेय नाटेकर, आमदार अॅड. कार्लस फरेरा यांच्यासहपोलिसांचाच फौजफाटा दाखल झाला. यावेळी विटंबना करणाऱ्यास सात दिवसांच्या आत गजाआड करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली. दिलेल्या मुदतीत जर संबंधितास अटक न केल्यास शिवप्रेमी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवप्रेमींच्या वतीने उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, गतवर्षी शिवजयंतीच्या मुहूर्तावर हा पुतळा स्थापित करण्यात आला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. घटनास्थळी अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक सागर एकोस्कर, जिवबा दळवी, निरीक्षक सीताकांत नाईक, अनंत गावकर उपस्थित होते. मंत्री निळकंठ हळर्णकर, श्रीपाद नाईक यांनी घटनेचा निषेध केला.

जिथे पुतळे, तिथे सीसीटीव्ही बसवा

समाजात दुही निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईलच, पण आता अशा घटना टाळण्यासाठी सरकारने राज्यात विविध ठिकाणी बसवण्यात आलेल्या पुतळ्यांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत, अशी मागणी आमदार कालुस फेरेरा यांनी केली.

शांतता बिघडवण्याचे उद्योग सुरु : मुख्यमंत्री

करासवाडा शिवपुतळ्याच्या विटंबनेबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सायंत यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, काही समाजकंटक शांतता बिघडवण्यासाठीच अशी कृत्ये करत असतात. परंतु, या प्रकरणाचा कसून तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

एसआयटीकडून चौकशी: जसपाल सिंग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या करासवाडा येथील पुतळ्याची करण्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून तपास केला जाणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी ही माहिती दिली. आपण स्वतः या प्रकरणातील तपासावर लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

शिवरायांची मूर्ती बदलण्याचा निर्णय

प्रशांत वाळके यांनी मोडतोड झालेली मूर्ती त्याच जागी ठेवणे योग्य नसल्याने त्याजागी दुसरी मूर्ती बसवण्याचा निर्णय झाल्याची माहिती दिली. तसेच औद्योगिक विकास महामंडळाकडे वसाहतीत नवा मोठा पुतळा बसविण्यासाठी जागेची मागणी केली जाणार असल्याचे सांगितले. सर्व जाती धर्मातील लोक घटनेनंतर एकत्रित आले. त्यामुळे या प्रकाराला धार्मिक किंवा जातीय वळण देण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. शिवप्रेमीनी चांगले सहकार्य करून शांतता बाळगल्याबद्दल तसेच तपासासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार. -जिवबा दळवी, उपअधीक्षक.

प्रकरणात एफआयआर नोंद करून तपास कार्य सुरू केले आहे. चौकशीसाठी क्राईम ब्रांचचे सहकार्य घेण्यात आले आहे. माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. सकाळी माहिती उपलब्ध झाल्यानंतर पोलिसांना तैनात करण्यात आले. - निधीन वाल्सन, उत्तर गोवा अधीक्षक.

मानवतेला काळिमा फासणारे हे कृत्य आहे. मंत्री फळदेसाई यांनी घेतलेल्या भूमिकेचे आपण स्वागत करतो. परकीय शक्ती देशात फूट घालण्याचा प्रयत्न करतात. व्यापासून सावध राहावे,अँड. रमाकांत खनप माजी केंद्रीय मंत्री

पुतळे उभारताना योग्य प्रक्रिया पूर्ण करून त्यांची उभारणी करावी, जेणे करून चुकीचे प्रकार टाळता येतील. तसेच कोणालाही हरकत असणार नाही. जोशुआ डिसोझा, उपसभापती.

राज्यातील छत्रपतीच्या पुतण्यांची वारंवार विटंबना होत असून या प्रकरणांची कसून चौकशी व्हायला हवी. - बजरंग दल

 

 

टॅग्स :goaगोवा