पणजी : गोव्यात 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष जल्लोषात साजरे झाले. मद्यपान आणि दारुकामाची आतषबाजीचा अनुभव पर्यटकांसह स्थानिक गोमंतकीयांनीही घेतला. बुधवारी सकाळी पणजी शहरातील अनेक फुटपाथवर दारुच्या बाटल्या फुटल्यानंतरच्या काचा पडलेल्या दिसून आल्या. तसेच बराच कचराही आढळून आला.
गोमंतकीयांनी एकमेकाला हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यास मंगळवारी मध्यरात्री आरंभ झाला होता. मंगळवारी मध्यरात्री दारूकामाची मोठी आतषबाजी केली गेली. काहीजणांनी कळंगुट, कांदोळी, मिरामार अशा समुद्रकिना:यांवर डोळ्य़ांचे पारणो फेडणारी आतषबाजी अनुभवली. आर्यलडचे पंतप्रधान लिवो वराडकर यांच्यासह अनेक अतिमहनीय व्यक्तींनी गोव्यात नववर्ष साजरे केले. काही राज्यांतील मंत्री, आमदार, उद्योगपती, बॉलिवूडचे काही कलाकार यांनीही गोव्यातच नववर्ष साजरे केले.
देश- विदेशातील लाखो पर्यटक अजून गोव्यात आहेत. त्यांनी नववर्ष गोव्यात साजरे करण्याबाबतचा आनंद लुटला. रात्री मेजवानीचे कार्यक्रम पार पडले. अनेक गोमंतकीयांनी संकल्प दिवस साजरे केले. पर्यटकांसह गोमंतकीयांनीही रात्र जागली. पणजी ते मिरामार ते दोनापावलर्पयतच्या फुटपाथवर अनेक गोमंतकीय सकाळच्यावेळी चालण्यासाठी जातात.
दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री गोव्यात वाहन अपघात होतात. यंदा मोठे अपघात झाले नाहीत, याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. फक्त नववर्षाच्या पूर्वसंध्येला सडा वास्को येथे एक वाहन अपघात घडला व त्यात 37 वर्षीय इसमाचा बळी गेला. सार्वजनिक ठिकाणी मध्यपान करण्यास बंदी आहे. तथापि, नववर्ष साजरे करताना उत्साही तरूणांनी व पर्यटकांनी मंगळवारी रात्री रस्त्याच्या बाजूला बसून मद्य प्राशन केले. तिथेच काहीजणांनी रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या. बुधवारी फुटपाथवर चालायला गेलेल्या अनेक गोमंतकीयांना फुटलेल्या बाटल्यांच्या काचा पहायला मिळाल्या. तसेच काहीजणांनी थंडी लागते म्हणून फुटपाथवरच मंगळवारी रात्री शेकोटी पेटवली होती. त्यामुळे फुटपाथवर राखही आढळून आली.