नारायण गावस
पणजी: मळा मारुतीगड येथील मारुतीराय संस्थानचा ९३ वा जत्रौत्सव आज पासून सुरु झाला असून २१ तारीख पर्यंत हा उत्सव चालणार आहे. पूढच्या वर्षी मारुतीरायाची साेन्याच्या मूर्तीने मिरवणूक काढली जाणार आहे. यासाठी भाक्तांकडून देणगीसाठी आवाहन केले आहे, असे या देवस्थान समितीचे खजिनदार सुभाष साखळकर यांनी सांगितले.
सध्या चांदीच्या पालखीतून मारुतीरायाची चांदीची मूर्ती आहे यावर्षी या चांदीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक हाेणार आहे. पण पुढच्या वर्षीपासून आम्ही साेन्याच्या मूर्तीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोन्याच्या मूर्तीसाठी भक़्तांकडून मिळेल ती देणगी घेतली जाणार आहे. ज्या देणगीदार ११ हजार पेक्षा जास्त देणगी देईल त्यांचे नाव फलकावर लावले जाईल भक्तगण यावेळी हाेईल तेवढी देणगी देऊ शकतात यासाठी कुठलीच मर्यादा घातलेली नाही. या भक़्तांच्या सहकार्याने नक्कीच पुढच्या वर्षी मारुतीरायाची मूर्ती साेन्याची असणार आहे, असे या समितीचे उपखजीनदार आशिष नागवेकर म्हणाले.
आज साय. पालखी मिरवणूक हाेणार आहे. ही पालखी रात्रभर असणार आहे. पहाटे ६ वा. मंदिरात पुन्हा येणार. या तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. नाटक तसेच इतर मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहे. सर्वांनी या जत्रोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन या देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.