सुशांत कुंकळयेकर
मडगाव: गोव्यात नव्याने पर्यटन हंगामाला सुरुवात झालेली असतानाच अंमली पदार्थाच्या व्यवहारालाही जोर आला आहे. या व्यवसायातील नायजेरियन ड्रग्स पेडलर्स सध्या सक्रीय झाले असून मागच्या दहा दिवसांतच अशा दोन पेडलर्सना अटक करण्यात आली. आतार्पयत या दोन घटनांत एकूण 14 लाखांचा कोकेन पोलिसांनी जप्त केला. उत्तर गोव्यात हा व्यवहार मोठय़ा प्रमाणावर चालू आहे.
गुरुवारी रात्री अंमली पदार्थ विरोधी पथकाने गिरी-म्हापसा येथील चर्चजवळ इजीफोर इमान्युएल इडोको या 32 वर्षीय नायजेरियनला अटक करुन त्याच्याकडून 121 ग्रॅम कोकेन जप्त केला. या विभागाचे उपअधीक्षक महेश गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या मालाची किंमत 12 लाख एवढी असून ड्रग्स विक्रीसाठीच हा संशयित चर्चजवळ आला असता त्याला अटक करण्यात आली.
सदर संशयित शिवोली येथे रहाणारा असून यापूर्वी दोनवेळा त्याला अशाच प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यवहारात अटक झाली होती अशीही माहिती प्राप्त झाली आहे. त्यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी कळंगूट पोलिसांनी केलेल्या कारवाईत मायकल निबुजे या 37 वर्षीय नायङोरियन संशयिताला अटक करुन त्याच्याकडून 37 ग्रॅम कोकेन जप्त केला होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 2 लाखाच्या आसपास आहे. 1 ऑक्टोबरपासून गोव्यात पर्यटन हंगाम सुरु झाला असून 4 ऑक्टोबरपासून विदेशी पर्यटक गोव्यात यायला लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे ड्रग्स पेडलर्स पुन्हा सक्रीय झाले आहेत.जानेवारी ते आतार्पयत अंमलीपदार्थ व्यवहारात सामील असलेल्या एकूण 30 विदेशी संशयितांना अटक केली असून यात सर्वात जास्त प्रमाण नायङोरियनांचे आहे. आतापर्यत गोवा पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत एकूण 17 नायङोरियांनाना अटक केली असून त्या पाठोपाठ रशियन संशयितांचा क्रमांक लागतो. त्यांची संख्या दहा आहे त्याशिवाय केनिया, इटली व नेपाळ या देशातील प्रत्येकी एका संशयिताला अटक केलेली आहे.
मागच्या मे महिन्यात ज्यावेळी गोव्यातील पर्यटन हंगाम संपायला येतो त्यावेळीही गोवा पोलिसांनी अशीच एक मोठी कारवाई करत चुकुवाडू इजेच्युकवू या नायङोरियनाला शिवोली येथे अटक करत तब्बल 55 लाखांचा अंमलीपदार्थ जप्त केला होता. त्या नंतर 27 जुलैला च्युकुवाडी ओफारमाला या 43 वर्षीय नायङोरियनाला पणजीत अटक करुन त्याच्याकडून 2.70 लाखांचा कोकेन जप्त केला होता. 13 ऑगस्ट रोजी हरमल येथे केलेल्या कारवाईत सहा नायङोरियांना अटक करुन 4.40 लाखांचा माल जप्त केला होता. सप्टेंबर महिन्यात शिवोली व कळंगूट येथे दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन नायङोरिनांना अटक करीत त्यांच्याकडून तब्बल 12 लाखांचा कोकेन जप्त केला होता.