वास्को : वास्को येथे रविवारी पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या १३व्या एसकेएफ रिव्हर मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या नीलेश कुळये आणि मुंबईच्या उर्मिला बानी यांनी पुरुष व महिला अनुक्रमे गटात विजेतेपद प्राप्त केले. त्याचप्रमाणे यूएसएच्या मारिसा मर्फी आणि उडुपीच्या सचिन पुजारी यांनी २० मायलर शर्यत जिंकली, तर गोव्याच्या सपना पटेल आणि रत्नागिरीच्या सिद्धेश बर्जे यांनी हाफ मॅरेथॉन जिंकली.
रत्नागिरीच्या नीलेश कुळयेने पुरुषांची सुमारे ४२ कि.मी ची पूर्ण मॅरेथॉन शर्यत २:४९:३३ अशी वेळे घेत जिंकली, तर महिला गटात मुंबईच्या उर्मिला बानीने ४:१५:२५ अशा वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. नव्याने सादर करण्यात आलेल्या २० मायलर शर्यतीत (३२ कि.मी) यूएसएच्या मारिसा मर्फीने महिलांच्या गटात २:४४:१९ तासांच्या प्रभावी वेळेसह विजेतेपद पटकावले, तर उडुपीच्या सचिन पुजारीने १:५७:५१ तासांमध्ये पुरुष गटात विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या सिद्धेश बर्जेने पुरुषांची हाफ मॅरेथॉन १:१३:२४ अशी वेळ घेत जिंकली आणि गोव्याच्या सपना पटेलने १:३५:२६ वेळ घेत महिलांची हाफ मॅरेथॉन जिंकली. तसेच मुलांच्या गटात मुरगाव हायस्कूल, वास्कोने ५ कि.मी सांघिक स्पर्धा जिंकली, तर मुलींच्या गटात विद्या विहार शाळेने ५ कि.मी सांघिक स्पर्धा जिंकली.
यूएसए, यूके, नेदरलँड्स, दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, पुणे आणि ठाणे यासारख्या ठिकाणांहून आलेल्या मॅरेथॉनपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
प्रतिक्रीया गेल्या तीन वर्षांपासून पोडियम फिनिशर असल्याने यावेळी देखील स्पर्धा जिंकणे हा दबाव होताच. चिखलीच्या टेकडीवर दोनदा धावणेआव्हानात्मक होते, यात वेळही खुप लागतो, अन्यथा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. -नीलेश कुळये, मॅराथोनपटू
हाफ मॅरेथॉन जिंकून खूप आनंदी आहे. मी दररोज खूप कठोर सराव करते. याचे सार्थक झाले. तसेच मी ५००० मीटर आणि १०,००० मीटर शर्यतीत गोव्याचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे, या अनुभवाचा फायदा मला यावेळी झाला. -सपना पटेल, मॅराथोनपटू
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे४२ कि.मी, पुरुष
१) निलेश कुळये (रत्नागिरी) २:४९:३३२) ओमप्रकाश सरन (बेंगळुरू) २:५०:४८३) नॅथन फ्लेअर (यूके) २:५८:०४
४२ कि.मी, महिला१) उर्मिला बानी (मुंबई) ४:१५:२५२) रेणू राजगुरु (रायपूर) ५:१७:३५३) वैजयंती (ठाणे) ५:१८:३०
२० मायलर (३२ कि.मी) पुरुष१) सचिन पुजारी (उडुपी) १:५७:५१२) हरिराम मौर्य (ठाणे) २:०७:०६३) लोकेश बघेल (बेळगाव) २:०८:०७
२० मायलर (३२ कि.मी) महिला१) मारिसा मर्फी (यूएसए) २:४४:१९२) शर्मिला कदम (ठाणे) २:४७:३१३) लतिका अरविंद (बेंगळुरू) २:४८:५०
२१ कि.मी पुरुष१) सिद्धेश बर्जे (रत्नागिरी) १:१३:२४२) अंकित यादव (वास्को) १:२६:१०३) किरॉन ब्राउन (यूके) १:३४:४७
२१ कि. मी महिला१) सपना पटेल (वास्को) १:३५:२६२) इमके ग्रेन्स (नेदरलँड्स) १:४१:४५३) राजलक्ष्मी स्वामीनाथन (बेंगळुरू) १:५१:०२
१० कि.मी पुरुष१) करण शर्मा (मुंबई) ००:३३:३६२) संजय झाकणे (परभणी) ००:३३:५१३) ओंकार बायकर (रत्नागिरी) ००:३४:१५
१० कि.मी महिला१) आश्लेषा मंगळे (कोल्हापूर) ००:४५:१६२) नीरा कटवाल (बेंगळुरू) ००:४६:४५३) खुशबू बघेल (ठाणे) ००:४८:३२
५ कि.मी शालेय संघ, मुले१) मुरगाव हायस्कूल, वास्को, १:२२:३५२) विद्या विहार हायस्कूल, कुठठाळी १:३१:५०३) केंद्रीय विद्यालय, १:३२:२८
५ कि.मी शालेय संघ, मुली१) विद्या विहार हायस्कूल, कुठठाळी, २:०३:११२) केशव स्मृती शाळा, २:१४:०३३) भारती विद्याभवन, २:१९:५०