शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

नितीन गडकरींची विश्वजीत राणे यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 9:33 AM

दोनापावल येथील एका हॉटेलमध्ये गडकरींचा मुक्काम होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी काल, शुक्रवारी स्वतंत्रपणे भेट घेतली. विविध विषयांवर त्यावेळी चर्चा झाली. सत्तरी तालुक्यातील केरी येथील बायपासचे काम करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली व गडकरी यांनी हे काम करण्याची ग्वाही विश्वजीत राणे यांना दिली आहे.

दोनापावल येथील एका हॉटेलमध्ये गडकरींचा मुक्काम होता. तिथे भेटण्यासाठी गडकरी यांनी विश्वजीत यांना वेळ दिली होती. विश्वजीत राणे यांनी तिथे गडकरी यांची भेट घेऊन बराचवेळ चर्चा केली. राजकीय व अन्य विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

केरी-सत्तरी येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने चोर्ला भागात जातात. तिथून ही वाहने बेळगावला जातात. केरीतील रस्ते अरुंद आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात दिवसरात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. काहीवेळा ट्रक बंद होऊन रस्त्याच्या बाजूला तसेच राहतात. या सगळ्या समस्या टाळण्यासाठी बायपास रस्ता मंत्री राणे यांनी सूचवला आहे. हा भाग पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मतदारसंघात येतो.

मंत्री विश्वजीत राणे यांनी 'लोकमत'ला सांगितले की, गडकरी यांनी बायपास मार्ग बांधण्यास अनुकूलता दर्शवली आहे. बायपासचे काम झाल्यानंतर वाहतूक समस्येवर तोडगा निघेल.

टॅग्स :goaगोवाNitin Gadkariनितीन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरी