पणजी : सांताक्रुझ पंचायतीच्या सरपंच जेनिफर दे ओलिव्हेरा व उपसरपंच एल्सन ब्राग्रांझा यांच्याविरोधात सहा पंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. तिसवाडी गट विकास अधिकाऱ्यांकडे (बीडिओ) याबाबतचे पत्र सादर केले आहे.
सरपंच ओलिव्हेरा या पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता गावशी संबंधीत निर्णय घेतात, विद्यमान सत्ताधारी मंडळाकडे गावच्या विकासाबाबत कुठलेही स्पष्ट धोरण नाही, सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील विकास कामांबाबतच्या अनेक फाईल्स मागील १० महिन्यांपासून सरका दरबारी प्रलंबित असून सरपंचांकडून त्याचा पाठपुरावा केला जात नसल्याचा आरोप या पंचायत सदस्यांनी केला आहे.
सांताक्रुझ पंचायतीचे एकूण ११ पंचायत सदस्य आहेत. त्यापैकी रोझी आगॉस्टा गोन्साल्विस फर्नांडिस,पीटर दा आरावजो, इनासिओ डॉमनिक परेरा, संदीप सावंत, लुईसा ॲंथन फर्नांडिस व लफिरा सांतान दे ऑलिव्हेरा या सहा पंचायत सदस्यांनी सरपंच जेनिफर दे ओलिव्हेरा व उपसरपंच एल्सन ब्रागंझा यांच्या विरोधात हा अविश्वास ठराव दाखल केला आहे.