शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

आठ लाख गमावणाऱ्या पुजाऱ्याला ग्राहक मंचाकडूनही दिलासा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 7:04 PM

स्वत:च्या चुकीमुळे रक्कम गमावल्यास बँक जबाबदार नसल्याचा निवाडा

मडगाव: ऑनलाईन फसवणुकीत 8.16 लाखांची रक्कम गमावून बसलेल्या कवळे येथील एका पुजाऱ्याला ग्राहक तक्रार निवारण मंचाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. स्वत:च्या चुकीमुळे झालेल्या ऑनलाईन गैरव्यवहाराला बँकेला जबाबदार धरता येऊ शकत नाही असे नमूद करत उत्तर गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा दावा फेटाळून लावला.कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या पुजाऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्र विरोधात नोव्हेंबर 2017 मध्ये हा दावा दाखल केला होता. त्यांच्या दाव्याप्रमाणे नोटबंदीच्या काळात या बँकेच्या कवळे शाखेत केलेल्या गैरव्यवहाराचा तंतोतंत तपशील देत त्यांना आपण आरबीआयचा अधिकारी अशी बतावणी करणारा फोन आला. झालेल्या व्यवहाराबद्दल सर्व माहिती देत तसेच त्यांच्या आधार कार्डाचा तंतोतंत नंबर सांगत त्या अज्ञात कॉल करणाऱ्याने त्या पुजाऱ्याचा विश्वास संपादित करत 17 फेब्रुवारी 2017 रोजी त्याच्याकडून एटीएमचा नंबर मागून घेतला. हा नंबर मागून घेताना तुमचा पीन नंबर कुणाला सांगू नका, अशी खबरदारीची सुचनाही त्यांना देण्यात आली. मात्र त्याच संध्याकाळी त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेले आहेत अशा आशयाचे त्यांना मॅसेज येऊ लागले. यामुळे भांबावलेल्या त्या पुजाऱ्याने 20 फेब्रुवारीला बँकेकडे संपर्क साधला असता तुम्ही सायबर क्राईम विभागामध्ये तक्रार द्या असे त्यांना सांगण्यात आले. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या खात्यातील 4.91 लाखांची रक्कम गोठवली गेली आहे हेही त्यांच्या लक्षात आले. यासंबंधी बँकेकडे संपर्क साधला असता सायबर विभागाच्या सुचनेवरुन ही रक्कम गोठवली गेली आहे. ती खुली करण्यासाठी आम्ही पत्र देऊ असे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. मात्र बँकेने शेवटर्पयत तसे पत्र दिले नाही. या पुजाऱ्याच्या खात्यावरील रक्कम मनोजकुमार व राजेशकुमार या व्यक्तींच्या नावे वळवली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.बँकेकडून आपल्याला कुठलेच सहकार्य मिळाले नाही. उलट बँकेकडे आपण केलेल्या व्यवहाराची ज्या अर्थी आपल्याला तंतोतंत माहिती देण्यात आली त्याअर्थी या घोटाळ्यात बँकेच्याच कुणा तरी अधिकाऱ्याचा हात असावा असा दावा करुन त्या पुजाऱ्याने ग्राहक मंचासमोर दावा दाखल करताना तब्बल 10 लाखाची नुकसान भरपाई आपल्याला देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र बँकेने आपल्यावरील सर्व आरोप नाकारताना सदर घटना घडल्यानंतर ग्राहकाने त्वरित बँकेशी संपर्क न साधता दोन दिवसांनंतर तो साधला याकडे लक्ष वेधले. ज्या व्यक्तींच्या नावावर ही रक्कम वळवली गेली त्या व्यक्तींशी बँकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याचा संबंध नव्हता. त्याशिवाय ज्या बँकांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली, त्या बँकांनाही या दाव्यात प्रतिवादी करुन घेतले नाही असा दावा करुन या घोटाळ्याशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला.मंचाच्या सदस्य वर्षा बाळे यांनी 3 फेब्रुवारीला दिलेल्या निकालात स्वत:च्या चुकीने जर ऑनलाईन फसवणूक झाली तर बँकेला जबाबदार धरता येत नाही असा यापूर्वी निकाल दिला आहे. हे नमूद करत या प्रकरणात बँकेकडून दिल्या गेलेल्या सेवेत कुठल्याही प्रकारची कमतरता दिसत नाही असे नमूद करत हा दावा फेटाळून लावला. 

टॅग्स :fraudधोकेबाजी