शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

उत्तर गोवा जिल्हापंचायत सदस्यांच्या स्वाक्षरी मोहिमेमुळे खळबळ

By वासुदेव.पागी | Published: November 17, 2023 2:34 PM

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची बैठक प्रलंबित आहे.

पणजी: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची बैठक घ्यावी यासाठी सुरू असलेली लगबग आणि सदस्यांच्या सह्यांची मोहीम यामुळे राजकारण चांगलेच रंगले आहे. जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष  बदलण्यासाठीही काही सदस्य धडपडत आहेत. 

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची बैठक प्रलंबित आहे. ही बैठक लवकर घेण्यात यावी यासाठी जिल्हा पंचायतीचे काही सदस्य आग्रही आहेत. त्यासाठी सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांच्यासह 10 पेक्षा अधिक सदस्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केले आहेत. मात्र हे पत्र जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव आणण्यासाठी नाही तर बैठक घेण्याची मागणी करण्यासाठी आहे. जिल्हा पंचायतीची बैठक घेण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे.

दरम्यान जिल्हा पंचायतीची बैठक प्रलंबित असली तरी ही बैठक न्याय्य  कारणासाठी पुढे ढकलण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो.  असे असतानाही काही सदस्यांनी बैठकीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केल्यामुळे उलट सुलट तर्क केले जात आहेत. सदस्यांना केवळ बैठक  हवी आहे की त्याहून अधिक काहीतरी हवे आहे अशा शंकाही निर्माण झाल्या आहेत. 

दरम्यान जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी आणखीही सदस्य इच्छुक आहेत. परंतु जोपर्यंत विद्यमान अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक हे या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्या पदी इतर कोणालाही संधी नाही. त्यामुळेच सिद्धेश नाईक यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे ही चर्चा आहे. मात्र याविषयी विचारले असता सिद्धेश नाईक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की जिल्हा पंचायत अध्यक्ष पदासाठी कोणती स्पर्धा नाही. अविश्वास ठरावाचा तर प्रश्नच नाही. जिल्हा पंचायतीची प्रलंबित असलेली बैठक केव्हाही घेता येईल, आणि ती घेतलीही जाईल.

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार जिल्हा पंचायती मधील घडामोडीचा भाजप राज्यस्तरीय समितीनेही दखल घेतली आहे. पंचायत सदस्यांच्या सह्यांच्या मोहिमेमुळे पक्षाने ही नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेठ तनावडे यांनी सह्यांची मोहीम हाती घेतलेल्या सदस्यांना योग्य समज दिली आहे.

टॅग्स :goaगोवा