शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

एनओएसच्या दहावी निकालात मोठा घोळ, ३८ विद्यार्थ्यांना दाखविलं गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 3:35 PM

- वासुदेव पागीपणजी: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय संचालीत राष्ट्रीय ओपन स्कूलच्या (एनओएस) दहावीच्या निकालात मोठा घोळ आढळून आला आहे. गोव्यातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३८ जणांना गुणपत्रिकेवर गैरहजर दाखविण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालक संतप्त झाले आहेत.केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाद्वारे संचालित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून मोठ्या प्रमाणावर गोव्यातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...

- वासुदेव पागीपणजी: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय संचालीत राष्ट्रीय ओपन स्कूलच्या (एनओएस) दहावीच्या निकालात मोठा घोळ आढळून आला आहे. गोव्यातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३८ जणांना गुणपत्रिकेवर गैरहजर दाखविण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालक संतप्त झाले आहेत.केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाद्वारे संचालित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मुक्त विद्यालयातून मोठ्या प्रमाणावर गोव्यातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गोव्यात या विद्यालयाची अनेक अभ्यासकेंद्रे आहेत आणि तीन परीक्षा केंद्रे आहेत. पैकी कुडचीरे येथील अभ्यास केंद्रात २५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.  एप्रीलमध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर झाला होता. परंतु त्यात या केंद्रावरील ३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा  दिलीच नसल्याचे त्यांच्या गुणपत्रिकेत म्हटले आहे. काही विद्यार्थ्याना दोन विषयात गैरहजर तर काहींना ३ विषयातही गैरहजर म्हणून शेरा लिहिण्यात आला आहे. या प्रकारामुळे कुडचिरे विद्यार्थी व पालकही संतापले आहेत. कुडचिरे येथील हेडमास्तर असलेले श्रीकृष्ण नाईक यांना याविषयी विचारले असता त्यांनी गैरहजर म्हणून दाखविण्यात आलेले विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती असे सांगितले. शिवाय तेथील नोंदवहीतही त्या विद्यार्थ्यांची नावे व स्वाक्षºया आहेत. हा विषय पुणे येथील विभागीय कार्यालयात पाठविण्यात आला असून तातडीने हालचाली करून समस्या सोडविण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पुण्याहून नंतर दुरुस्तीचे निकालपत्रही आले आहे. त्यात विनाकारण गैरहजर म्हणून नोंदले गेलेल्या ३८ पैकी १७ विद्यार्थ्यांचा निकाल दुरुस्त करून पाठविण्यात आला आहे. त्यातही पुन्हा आणखी त्रुटी राहिल्या आहेत. जे तीन विषयात गैरहजर दाखविण्यात आले होते ते दुरुस्तीच्या गुणपत्रकात १ विषयात नापास म्हणून दाखविण्याचेही प्रकार घडले आहेत. म्हणजेच दुरुस्तीचा निकालही पुन्हा सदोष पाठविण्यात आला आहे. या विषयी विभागीय सहसंचालक अशोक कुमार आणि एनआयओएसच्या गोवा विभागाचे प्रमुख सुनिल माने यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उठविला नाही.