शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ज्येष्ठता नव्हे, परफॉर्मन्स दाखवा, केजरीवालांचा गोव्यातील कार्यकर्त्यांना सल्ला

By admin | Published: August 23, 2016 9:11 PM

केवळ ज्येष्ठतेच्या आधारे आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोठे पद मिळेल असे नाही. केवळ ज्येष्ठता नव्हे तर परफॉर्मन्स दाखवाअसा सल्ला आपच्या गोव्यातील सर्व प्रमुख कार्यकत्र्याना

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. २३ : केवळ ज्येष्ठतेच्या आधारे आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोठे पद मिळेल असे नाही. केवळ ज्येष्ठता नव्हे तर परफॉर्मन्स दाखवा असा सल्ला आपच्या गोव्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दिला.

विविध मतदारसंघांसाठी आपने जे समन्वयक नेमले आहेत, त्यांनाच येत्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट मिळेल असे कुणीच गृहित धरू नये, असेही केजरीवाल यांनी सांगितले. कुणीच कुणाला तिकीटाची हमी देऊ नये. मी स्वत: देखील देऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला आपच्या उमेदवार निवडीच्या व्यवस्थेमधूनच जावे लागेल. आमची व्यवस्था ठरलेली असून त्या व्यवस्थेद्वारेच उमेदवार निवडले जातील. काही कार्यकर्ते इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीच्या माध्यमातून आपमध्ये आले. काही कार्यकर्ते नंतर आले.

कुणीच आपण या बॅचचा कार्यकर्ता किंवा त्या बॅचचा कार्यकर्ता असे समजू नये. अगदी कालपरवा देखील आपमध्ये जो कार्यकर्ता आलेला असेल त्या कार्यकत्र्याने जर चांगला परफॉर्मन्स दाखवला व गुणांनी तो चांगला असेल तर त्यास आपमध्ये मोठे पद मिळेल. अशावेळी आपल्यावर अन्याय झाला अशी भावना ज्येष्ठ कार्यकत्र्यानी मनात आणू नये, असे केजरीवाल यांनी बजावले.आपली चार दिवसांची गोवा भेट आटोपून केजरीवाल मंगळवारी सायंकाळी दिल्लीस परतले. जाण्यापूर्वी पणजीत त्यांनी आपच्या राज्यभरातील प्रमुख कार्यकत्र्याची एकत्रित बैठक घेतली व त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपण गोवाभर फिरलो तेव्हा आपसाठी अनुकूल वातावरण आपल्याला अनुभवायला मिळाले. या अनुकूलतेचा लाभ उठवायचा असेल तर तुम्हाला सर्वानाच जास्त काम करावे लागेल.

जास्त वेळ द्यावा लागेल, असेही केजरीवाल यांनी सांगितल्याचे पक्ष सुत्रंनी स्पष्ट केले. आपल्या काही बैठकांसाठी गोव्यात जागा देखील अपुरी पडली, लोकांचा एवढा प्रतिसाद लाभला. आपमध्ये कुठल्याही पक्षामधून कार्यकर्ते येऊ द्या. भाजप किंवा काँग्रेसमधूनही ते येऊ द्यात, त्यांचे स्वागत करा, त्यांना आपल्यातलेच समजा. आपणच तेवढे संत व चांगले व दुसरे वाईट अशी भावना कुणीच आणू नये,असाही सल्ला केजरीवाल यांनी कार्यकत्र्याना दिला. आम्ही जाहीर केलेला एखादा उमेदवार गुणांनी योग्य नाही, असे ऐनवेळी निवडणुकीप्रसंगी जर कुणी सिद्ध केले तर आम्ही त्या उमेदवारास मागे घेऊ व त्या जागेवर पाणी सोडू, असेही केजरीवाल यांनी सांगितले.