शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सला नोटीस, "हे" प्रकरण भोवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 1:42 PM

Karan Johar : करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शन्सला चित्रीकरणाच्यावेळी नेरूल येथील 'कोको बीच'वर कचरा केल्या प्रकरणी गोवा मनोरंजन संस्थेने नोटीस बजावली आहे

पणजी - बॉलिवूड अभिनेता तसेच निर्माता करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शन्सला चित्रीकरणाच्यावेळी नेरूल येथील 'कोको बीच'वर कचरा केल्या प्रकरणी गोवा मनोरंजन संस्थेने नोटीस बजावली आहे तर दुसरीकडे याप्रकरणी करण जोहरने माफी न मागितल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा 'लोकांचो एकवोट' या संघटनेने दिला आहे. 

एका हिंदी सिनेमासाठी चित्रीकरणाच्यावेळी नेरुल येथील कोको बीच या किनाऱ्यावर कचरा करण्यात आला. पीपीई कीट उघड्यावर फेकण्यात आले. चित्रीकरण संपल्यानंतर कचरा उचलणे ही कंपनीची जबाबदारी होती परंतु साफसफाई न करतात कचरा तसाच टाकून सर्वजण निघून गेले. या पार्श्वभूमीवर कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी कोर्टात जाऊ, असा इशारा संघटनेकडून देण्यात आलेला आहे. कचऱ्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे तसेच हा कचरा कुजला आहे, असेही संघटनेचे म्हणणे आहे.

लाइन प्रोड्युसरला नोटीस          स्थानिकांकडून तसेच वरील संघटनेकडून या प्रकरणी तक्रार आल्यानंतर गोवा मनोरंजन संस्थेने मुंबईस्थित धर्मा प्रोडक्शनच्या लाइन प्रोड्युसरला नोटीस बजावली आहे. परंतु या नोटिशीची दखलही कंपनीने घेतलेली नाही. कचरा तसाच ठेवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

आमदाराकडून संताप व्यक्त        दरम्यान, गोवा फॉरवर्डचे स्थानिक आमदार जयेश साळगांवकर यांनीही या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, स्थानिक पंचायतीला यापुढे अशा चित्रीकरणासाठी परवानगी देऊ नये असे बजावण्यात आले आहे. २८ ऑक्टोबरपासून पुढील दहा दिवस वेरें येथे एका हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी मागितली होती. त्याला परवानगी देऊ नये, असे ग्रामपंचायतीला मी सांगितले आहे. काही लोक खाजगी जागेत चित्रिकरणासाठी परवानगी देतात. अशी कोणत्याही प्रकारची अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही. माझ्या मतदारसंघात स्वच्छतेला मी अधिक प्राधान्य देत आहे, असे साळगांवकर म्हणाले. 

टॅग्स :Karan Joharकरण जोहरgoaगोवा