फोंडा - पिळये धारबांदोडा येथे ट्रक व दुचाकी च्या दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला, तर गाडीवरील त्याचा मुलगा व अन्य एक किरकोळ जखमी झाले.
सविस्तर वृत्तानुसार उसगाव येथे राहणारा सब्बेलाल जयसिंह ( वय 34, मूळ मध्य प्रदेश) आपली दुचाकी (क्रमांक जीए - 05 - क्यू - 1170) वरून आपल्या मुलाला घेऊन घरी जात होता. त्याचवेळी धोकादायक वळणावर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक (क्रमांक जीए ०५ ती 13 90 ) ची धडक दुचाकीला बसली. सदर धडक बसताच दुर्दैवी सुभेलाल हा ट्रकच्या खाली आला व जागीच मृत्यू पावला. ट्रक वरील अन्य एक व्यक्ती व मुलगा हे मात्र सही सलामत बचावले.
ह्या अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शव चिकित्सा करण्यासाठी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून दिला.
नागरिक व पोलिसांची बाचाबाची: अपघाताची माहिती मिळताच धारबांदोडा ग्रामपंचायतचे सरपंच बालाजी गावस हे सुद्धा अपघात ठिकाणी पोहोचले. सदर अपघातात ट्रक चालकाची चूक आहे हे लक्षात मृत सुभेलाल याला न्याय मिळावा म्हणून पोलिसांकडे चर्चा केली. ट्रक चालक आल्यानंतरच प्रेत तिथून हलवावे अशी मागणी बालाजी गावस यांनी केली. मृत सुभेलाल याच्या कुटुंबियांना काही आर्थिक मदत मिळावी ह्या हेतूने त्यांनीही मागणी केली होती. मात्र पोलिसांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावत मृत सूब्बेलालचे शव तिथून हलवले.
दोन लहान मुले: सदर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुभेलाल याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. घरात तो एकटाच कमावणारा होता. तो मूळ मध्य प्रदेश येथील असला तरी सध्या आपल्या कुटुंबासह उसगाव येथे राहत होता. फोंडा पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे.