- नारायण गावस
पणजी: गोवा सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच घनकचरा व्यावस्थापन खात्यातर्फे माजी केद्रीय संरक्षण मंत्री व माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जयंती निमित्त मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी गोवा सरकारची एक्सर्ट कमिटी अध्यक्ष शास्त्रात डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती या कमिटीचे सदस्य तसेच जीपीएसची अध्यक्ष जुझे नोराेन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी त्यांच्यासोबत या समितीचे सदस्य एनआयओचे संचालक डॉ. सुनिल सिंग, गोवा विद्यापीठाचे सतीश शेट्ये व इतर सदस्य उपस्थत होते. मनोहर पर्रीकर जयंती निमित्त हा मनाेहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी देशभरातील युवा शास्त्रज्ञांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. या पुरस्कारासाठी ५ लाख राेख रुपये देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी शास्त्रज्ञांकचे किमान वय ३५ असावे, असे नोराेन्हा यांनी सांगितले.
या पुरस्कारामुळो युवा शास्त्रज्ञानंचे मनाेबल आणखी वाढणार आहे. त्यांचे कार्य तसेच त्यांनी केलेले एकूण शाेध यांच्या आधारावर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त युवा या क्षेत्राकडे यावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. देशात नवीन शास्त्रज्ञ निर्माण व्हावे हा या मागचा मुख्य हेतू आहे, असे एक्सपर्ट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.