शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

ओबीसींना वाढ, एसटींना धक्का

By admin | Published: September 25, 2015 2:13 AM

पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांच्या येत्या २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासन खात्याने गुरुवारी प्रभाग आरक्षण जाहीर केले.

पणजी : राज्यातील अकरा नगरपालिकांच्या येत्या २५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासन खात्याने गुरुवारी प्रभाग आरक्षण जाहीर केले. आरक्षणातील बदलामुळे ओबीसींना नऊ जागा वाढवून तर अनुसूचित जमातींना (एसटी) सहा जागा या वेळी कमी करून मिळाल्या आहेत. प्रथमच अनुसूचित जातींना एकूण तीन जागा आरक्षित करून मिळाल्या आहेत. दरम्यान, अनुकूल आरक्षणासाठी भाजप सरकारने मॅच फिक्सिंग केल्याची टीका विरोधकांनी केली. राज्यातील अकरा पालिकांमध्ये आजपासून (दि.२५) आचारसंहिता लागू होत आहे. पालिका प्रभाग आरक्षण अधिसूचना जारी करण्यास शासकीय पातळीवरून खूप विलंब करण्यात आला. अधिसूचना गुरुवारी दुपारी जारी करण्यात आली. या वेळी प्रथमच ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे २०१०च्या तुलनेत आता नऊ जागा जास्त मिळाल्या आहेत. अनेक नगरसेवकांचे पत्ते गुल मडगाव, मुरगाव, म्हापसा, कुंकळ्ळी, कुडचडे, केपे, काणकोण, पेडणे, डिचोली, सांगे आणि वाळपई या पालिकांच्या निवडणुका होत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांचे पत्ते गुल झाले आहेत. अकरा पालिकांच्या एकूण १५९ प्रभागांपैकी ८९ जागा या सर्वसाधारण गटासाठी आहेत. उर्वरित जागा महिला, ओबीसी, ओबीसी महिला, एसटी व एससींसाठी आरक्षित झाल्या आहेत. महिलांना एकूण ४९ प्रभाग आरक्षित करून मिळाले आहेत. त्यात सोळा ओबीसी महिला प्रभागांचा समावेश आहे. मडगाव, कुडचडे, केपे, कुंकळ्ळी व सांगे या पालिकांमध्ये एसटींना एकूण सात जागा आरक्षित करून दिल्या आहेत. (खास प्रतिनिधी)