सूरज नाईकपवार, लोकमत न्युजनेटवर्क, मडगाव:न्यायालयात आपल्या अशिलाविरोधात निकाल लागल्यानंतर भर न्यायालयात आक्षेपार्ह वर्तन केल्याबद्दल एका वकिलाच्या त्या कृतीची गंभीर दखल न्यायालयाने घेताना त्याला कारणे दाखवा नोटीस बजाविली.
वकील आनाक्लेत व्हिएगस यांच्याबाबतीत हा प्रसंग ओढवला. या वकिलाचे एकूण कृती ही न्यायालयाचे प्रावित्र भंग करणारी असल्याची टिप्पणी न्यायाधीक्ष पूजा यु. एस. सरदेसाई यांनी केली.त्याच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात कलम १५ (२) १९७१ कायद्यातंर्गंत कारवाई का करु नये असेही न्यायालयाने विचारले आहे.
१९ मार्च रोजी वरील घटना घडली होती. येथील दिवाणी न्यायालयात एक खटला चालू होता. इंदुमती दामोदर लोटलीकर व चंद्रकांत शंकर मडकईकर यांच्यात हा खटला सुरु होता. खटल्याचा निकाल इंदुमती हिच्या बाजूने लागला. वकील व्हिएगस यांनी मडकईकर यांचे वकिलपत्र घेतले होते.