पणजी - अरबी समुद्रातील ओख्खी चक्रिवादळ अजूनही गतीमान स्थितीत असून ताशी १८५ किलोमीटर गतीने हे वादळ वायव्येच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. चक्रिवादळामुळे गोव्यातही समुद्र खवळलेला आहे.
गुरूवारी तिरुअनंतपुरम्च्या दक्षीणेला ७० किलोमीटरवर तर कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला तितक्याच अंतरावर निर्माण झालेल्या या चक्रिवादळाचे ओख्खी असे नामकरण करण्यात आल्यानंतर शुक्रवारी लक्ष्यद्वीप दीपसमुहाच्या दिशेने सरकले होते. गुरूवारी रात्री ११.३० वाजता ताशी ९० ते १०० किलोमीटर इतके होती. शुक्रवारी ते आणखी गतीमान होऊन ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने धावत होते. शनिवारी वादळाची गती वाढून ताशी १६५ ते १८५ एवढे गतिमान झाले होते. रविवारी पहाटे साडेपाचनंतर वादळ मंदावण्यास सरूवात होणार असल्याचे हवामान खात्याने महटले आहे. खबरदारीचे उपाय म्हणून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याने दिला अहे.
नंतर शुक्रवारी ९० ते १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने किनाºयाच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत हे चक्रिवादळ सरकत होते. असल्यामुळे केरळ किनारपट्टी व तामीळनाडू किनारपट्टीव् अरबी समुद्रात यंदा झालेले हे पहिलेच चक्रिवादळ आहे.
साडेचार वाजताच अंधारलेगोव्यात या वादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नसला तरी शनिवारी जोराचा वारा सुटला होता. शुक्रवारी मध्यरात्री गोव्याच्या अनेक किनारपट्टीभागात पाण्याच्या पातळीत वाढही झाल्याची माहिती मच्छिमारांनी दैनिक लोकमतला दिली. शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजताच तिन्ही सांजा झाल्यासारखे वातावरण दिसत होते. अभाळ काळ््या ढगांनी झाकोळलेले दिसत होते. चक्रिवादळामुळे केरळ किनारपट्टीभागात तसेच अरबी समुद्रात पाऊस पडत आहे. त्यामुळेच हे वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.