पणजी: राज्यात लाेकसभा निवडणूकांना ६ महिना उरले तरी काँग्रेस एक्टीव दिसत नाही याचा फायदा भाजपला होणार आहे. आमची कॉग्रेससोबत पूर्वीची युती आहे त्यावेळचे नेते आता नाहीत. काँग्रेस पक्ष नव्या चेहऱ्यांच्या हातात असल्याने त्यांचा काय विचार आहे माहित नाही. पण काँग्रेसकडून केेली जाणारी हलगर्जीपणा भाजपला फायद्याची ठरणार आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आम्ही राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्याच्या उपस्थितीत विधानसभेच्या निवडणूकीत युती केली होती.आता युती तुटलेले नाही पण अजूनही कॉग्रेसने आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. आता सहा महिने निवडणूकीला उरले असून कॉंग्रेस काेण उमेदवार ठेवणार माहित नाही. या सहा महिन्यात तो कसा सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. असे अनेक आव्हाहने आहेत. पण जेवढा उशीर कॉग्रेसला होणार आहे तेवढा भाजपला फायदा होणार आहे, असे मत विजय सरदेसाई यांनी व्यक्त केेले.- एसआयटी समितीने लाेकांना न्याय द्यावाराज्यातील माेठ्या प्रमाणात जमिन हडप केल्या जात असल्याने एसआयटी नेमली आहे. एसआयटीचा मुळ मुद्या हा लाेकांना न्याय मिळवून देणे आहे. आज कोणीही येथे जामिनीवर कब्जा करत आहे. अशी कब्जा पार्टी आम्हाला गोव्यात नको आहे. गाेव्याचे पारंपरिक जमिनीचे रक्षण गरजेचे आहे. उत्तर गाेव्यात माेठ्या प्रमाणात जमिनींचे भुरुपांतर होत आहे. हे गाेव्यासाठी घातक आहे, असेही विजय सरदेसाई म्हणाले.
आज सरकार लोकांना विश्वासात घेत नसल्याने अनेक प्रकल्पांना विरोध हाेत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा गाजत आहेत लोक जागृत झाले आहे. जाेपर्यंत सरकार लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्प आणत नाही ताेपर्यत असेच विरोध होणार आहे, असेही विजय सरदेसाई म्हणाले.