- सद्गुरु पाटील
लोकसभा निवडणूक पुढील शंभर दिवसांनंतर कधीही होऊ शकते. आगामी दोन-अडीच महिने हे अधिक महत्त्वाचे आहेत. या कालावधीतील राज्यातील वातावरणनिर्मिती, लोकांच्या मानसिकतेवरील सकारात्मक- नकारात्मक परिणाम, सत्ताधाऱ्यांकडून किंवा विरोधकांकडून निर्माण केले जाणारे वाद, केल्या जाणाऱ्या चुका या सगळ्यांचा परिणाम हा मतदानात दिसत असतो. 'पब्लिक मेमरी इज शॉर्ट', असे म्हटले जाते. निवडणूक काळात जे वातावरण तयार झालेले असते ते महत्त्वाचे असतेच.
२०२४ची लोकसभा निवडणूक गोव्यातील खिस्ती मतदारांच्या दृष्टीकोनातून समजून घ्यावी लागेल, मणिपुरमधील हिंसक घटनांनंतर देशातील एका विशिष्ट वर्गात अस्वस्थ भूमिका पाहायला मिळाली होती, गोवाही याला अपवाद नव्हता, देशातील हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजप अलीकडे विधानसभा निवडणूक मोठ्या यशाने जिंकला, त्यानंतर तयार झालेले वातावरणही विचारात घ्यावे लागेल.
भाजपसाठी उत्साहवर्धक स्थिती तयार झाली, हे मान्य करावे लागेल, गोव्यातील बार्देश, तिसवाडी, सासष्टी आणि मुरगाव या तालुक्यांमध्ये तुलनेने खिस्ती मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. फोंडा, पेडणे, सांगे, केपे, काणकोण या तालुक्यांतही खिस्ती समाज आढळतो. पण, तिथे संख्या बरीच कमी आहे. पेडणे व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांत मिळून पाच हजार मतदारसंख्या आहे. त्यातही मांद्रे मतदारसंघात ती जास्त आहे. तिसवाड़ी ते सासष्टीपर्यतच्या चार तालुक्यांतील खिस्ती मतदार है अधिक जागृत व अधिक सक्रिय असतात, बहुतांशआंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो.
ख्रिस्ती समाजातील बहुतांश पर्यावरणप्रेमी कार्यकर्तेही सासष्टी, मुरगाव, बार्देश व तिसवाडी या चार तालुक्यांतून येतात. यावेळी भाजपने बहुतांश राजकीय खिस्ती नेते हे स्वत:च्या बाजूने ठेवलेले आहेत. त्यापैकी काही नेते बेट भाजपचे आमदार, मंत्री झाले आहेत, तर आलेक्स रेजिनाल्ड (कुडतरी) यांच्यासारख्या आमदारांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वास हेही सरकारसोबत आहेत, जे खिस्ती आमदार पूर्वी जास्त प्रमाणात काँग्रेससोबत असायचे ते आता भाजपसोबत आहेत. या उलट काँग्रेसकडे फक्त तीन आमदार आहेत. तिघेही खिस्ती, विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाकडे आणि आरजी पक्षाकडे एकही खिस्ती आमदार नाही, अशावेळी खिस्ती मतदार लोकसभा निवडणुकीवेळी कुठच्या बाजूने राहतील? अर्थात भाजपला ख्रिस्ती मतदारांमध्ये स्थान मिळालेले आहे, हे मान्य करावे लागेल.
भाजपने सोशल इंजिनियरिंग प्रभाती पद्धतीने केले आहे. आता लोकसभा निवडणुकीवेळी खिस्ती मंत्री व आमदारांमुळे भाजपला खिस्ती मतदारांची जास्त मते मिळतील की नाही, हे पाहावे लागेल, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपकडे मोठ्या प्रमाणात भंडारी समाजातील नेते होते, उमेदवार होते, पण भंडारी समाजबांधवांनी मते दिली नव्हती. त्यांची मते त्यावेळी काँग्रेस व गोया फॉरवर्डकडे गेली होती, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर (फॉरवर्ड), दयानंद सोपटे (त्यावेळी काँग्रेसतर्फ), सुभाष शिरोडकर (काँग्रेसतर्फे) व अन्य नेते निवडून आले होते.
आता ख्रिस्ती मंत्री, आमदारांमुळे जर बहुसंख्य किंवा ५० टक्के खिस्ती मतदारांनी भाजपला साथ दिली, तर काँग्रेस व आरजीचे नुकसान होऊ शकते. येथे एक लक्षात घ्यावे लागेल की, आमदार सांगतात तसेच लोकसभा निवडणुकीवेळी मतदार मतदान करतात. असे दरवेळी होत नाही. मात्र, जे मंत्री, आमदार सक्रिय असतात, लोकप्रिय असतात त्यांच्या कलानुसार मतदार मतदान करतही असतात, माविन गुदिन्हो यांच्यासारखे मंत्री है दाबोळीत खूप सक्रिय आहेत, त्यांचा लोकसंपर्क दावोळीत मोठा आहे. संकल्प व दाजी साळकर हे मुरगाव तालुक्यात प्रभावी आहेत. दिगंबर कामत महगाव मतदारसंघातील मते भाजपच्या लोकसभा उमेदवाराला मिळवून देऊ शकतात, शेवटी भाजप किंवा काँग्रेस है उमेदवार म्हणून कुणाला उभे करतात, ते देखील पाहावे लागेल.
माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी परवाच 'लोकमत' कार्यालयास भेट देऊन प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम केला, सावईकर यांना पुन्हा खासदार होण्याची इच्छा आहे. त्यांना वाताचरण अनुकूल दिसते. ते भाजपच्या सर्व कार्यकत्यांना दक्षिणेत ओळखतात, ते लोकांमध्ये फिरत आहेत. यावेळी भाजपकडे जास्त आमदार असल्याने सावईकर यांची अपेक्षा वाढली आहे. खिस्ती मतदारांनी पूर्वी एकदा (२०१४ साली) त्यांना मते दिली होतीच बाबू कवळेकर हेही भाजपच्या तिकिटाचे दावेदार आहेत. त्यांनी दक्षिणेत सगळीकडेच फिरणे सुरू ठेवलेय, आपण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेलो असल्याने आपला ख्रिस्ती मतदारांत जास्त संपर्क आहे, असे कवळेकर यांना वाटते, काँग्रेसतर्फे एल्वीस गोम्स, खासदार सार्दिन आणि गिरीश चोडणकर हे इच्छुक आहेत, यापैकी कोणता उमेदवार खिस्ती मतदारांना आपला वाटेल, हे सांगता येत नाही, सार्दिनचे वय झालेय पण सादिन वांचा परिचय असलेले मतदार जास्त आहेत, असे एक गट मानतो. एल्वीस व गिरीश यांच्यापैकी कोणता उमेदवार खिस्ती मतदारांना आपला वाटेल, हे एकदा तपासून पहावे लागेल, कॉंग्रेसकडे जर सर्वेक्षण करण्याची पद्धत असेल तर काँग्रेसने तिकीट वाटपापूर्वी तसे सर्वेक्षण करून घ्यावे लागेल.
पूर्वी मनोहर पर्रीकर यांच्यामुळे खिस्ती मतदार भाजपला मते द्यायचे आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा खिस्ती मतदारांवर अजून प्रभाव नाही, पोर्तुगीजकालीन सगळ्या खुणा पुसून टाकू, अशा प्रकारची विधाने मुख्यमंत्र्यांनी साततत्याने करून गोव्यातील खिस्ती मतदारांमधील अनेकांना थोडे दुखावले आहेच पर्रीकर अगदी जाणीवपूर्वक अशी विधाने करणे टाळायचे, ख्रिस्ती मतदारांना पर्रीकरांनी एकदाच दुखवले होते. गुड फ्रायडेची सुट्टी रद्द करून नंतरच्या काळात मात्र पर्रीकर यांनी चूक दुरुस्त करून आपले अल्पसंख्यांकांशी नव्याने नाते तयार केले होते. गेल्या २०१९ सालीही पंतप्रधान मोदींची लाट होती, पण दक्षिण गोव्यात भाजपचा पराभव झाला होता. अर्थात ती कारणे वेगळी होती, त्यात मोदी करिष्म्याचा दोष नव्हता.
दक्षिणेत आरजीने मते काढली, तर निकाल ठरेल चुरसपूर्ण
आरजी पक्षाने यावेळी दिलेला युवा उमेदवार महत्त्वाचा आहे. तो एसटी समाजातील आहे. राव येथील नागरिक असलेला रुपर्ट परेरा हा आरजीचा आता दक्षिण गोव्यातील चेहरा बनला आहे. आमदार वीरेश बोरकर आणि आरजी प्रमुख मनोज परब हे रुपर्ट परेरा यांना घेऊन सगळीकडे दक्षिणेत फिरत आहेत, सांगे, केपे, काणकोण, सासष्टीत ख्रिस्ती व हिंदू एसटी समाज मोठा आहे. तेथील बन्यापैकी मते जर रुपर्ट परेरा काढू शकले, तर दक्षिणेतील निवडणूक निकाल हा मजेशीर लागू शकतो.
उत्तरेत भाजप उमेदवार सुरक्षित?
उत्तर गोव्यातील बार्देश व तिसवाडी तालुक्यातील ख्रिस्ती मतदारांचा भाजप जास्त विचार करणार नाही. पर्वरी, कळंगुट, शिवोली, पणजी, ताळगाव, साळगाव, थिवी, कुंभारजुवे, सांताकुद्धा असे विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेच. उत्तरेत भाजपने कुणालाही तिकीट दिले, तरी उत्तरेत जिंकण्याची शक्यता जास्त आहेच. कारण, गेली पंचवीस वर्षे उत्तरेची जागा भाजपकडे आहे.
स्वामींना खरेच लढण्याची इच्छा?
तपोभूमीचे स्वामी ब्रह्मेशानंद यांनी भाजपच्या तिकिटावर कुठेच जाहीरपणे दावा केलेला नाही. मात्र, त्यांच्यासोबत उत्तर गोव्यात अनेक लोक आहेत, हे मान्य करावे लागेल. हिंदू बहुजनांमधील लोक त्यांचे अनुयायी आहेत. मात्र, राजकारण हे शेवटी वेगळे असते. स्वामीनाही निवडणूक लढण्याची इच्छा आहे, असे मानणारे काही आमदार व मंत्री गोवा भाजपमध्ये आहेत. चलो अयोध्या अभियानाचा चांगला परिणाम उत्तरेत तयार झालेला आहे. ब्रह्मेशानंद स्वामींनी अजून निवडणुकीविषयी कुठेच भाष्य केलेले नाही, ते भविष्यात भाष्य करतील काय पाहावे लागेल. उत्तर गोव्यात त्यांचे हितचितक कमी नाहीत आणि भाजपमध्येही काही छुपे हितचिंतक आहेतच. ब्रह्मेशानंद स्वामी पूर्वी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आदींना भेटले आहेत. मात्र, ती राजकीय भेट नव्हती असे काहीजण सांगतात. समजा भाजपने एकवेळ ब्रह्मशानंद स्वामींना तिकीट दिले, तर बार्देश व तिसवाडीच्या खिस्ती मतदारांची प्रतिक्रिया काय असेल, याचा अंदाज येतो. पण, शेवटी उत्तर गोव्यात जिंकण्यासाठी हिंदू बहुजन मतदारच पुरेसे ठरत असतात.