शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

कारची धडक बसून दुचाकीचालक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 6:01 PM

गोव्यातील दक्षिण गोव्यातील वार्का येथे आज दुपारी महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत आल्टो कारने धडक दिल्याने एक दुचाकी चालक जागीच ठार झाला.

मडगाव - गोव्यातील दक्षिण गोव्यातील वार्का येथे आज दुपारी महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत आल्टो कारने धडक दिल्याने एक दुचाकी चालक जागीच ठार झाला. मारुती कुपुटगिनी असे मयताचे नाव आहे. मयत अंदाजे ४0 ते ४५ वयोगटातील असून, तो याच भागातील नोवानगाळ - वार्का येथील रहिवाशी आहे.महाराष्ट्र राज्याच्या नोंदणीकृत एमएच 0९ सीएम ५७७२ या आल्टो कारने स्पेलंडर मोटरसायकलला धडक दिली. कार चालक यशवंत गोपाल गुरव (२८) याच्यावर गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली असून तो महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हयातील आहे.आपल्या बहिणीला पोहचविण्यासाठी तो आला होता. ओडली येथे तो जात होता. दुचाकीचालकाने अंतर्गंत रस्त्यावर जाण्यासाठी वळसा घातला असता, त्याला कारची धडक बसली. यात गंभीर जखमी होउन त्याला मरण आले. मागाहून हॉस्पिसियो इस्पितळात त्याला दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. भारतीय दंड संहितेच्या ३0४ (अ) कलमाखाली संशयितावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा