शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

शिकारीसाठी गेलेल्या इसमाच्या बंदुकीची गोळी लागून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 7:42 PM

उत्तर गोव्यातील व्हावटी वाठादेव (डिचोली) येथे रानात शिकरीसाठी गेलेल्या एका शिकाऱ्याने सावजावर झाडलेली गोळी दुसऱ्या इसमास लागल्याने संतोष  गोवेकर (५५) हा व्हावटी  वठादेव येथील इसम ठार झाला.

डिचोली : उत्तर गोव्यातील व्हावटी वाठादेव (डिचोली) येथे रानात शिकरीसाठी गेलेल्या एका शिकाऱ्याने सावजावर झाडलेली गोळी दुसऱ्या इसमास लागल्याने संतोष  गोवेकर (५५) हा व्हावटी  वठादेव येथील इसम ठार झाला. या प्रकरणी गोळी झाडणारा आनंद यशवंत गावडे  (३९) हा डिचोली पोलिसांना शरण आला व त्याने बंदुकीसह पोलिसांना घडलेल्या प्रकारची कबुली दिली. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी आनंद यशवंत गावडे यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवताना भादंस ३०२ कलमाखाली तसेच बंदूक बाळगल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष गोवेकर व आनंद गावडे हे दोघेकला सायंकाळी एकत्र आले व साडेसहाच्या सुमरास व्हाव्हटी येथील जंगलात शिकारीसाठी गेले होते. सव्वाआठच्या सुमरास जंगलात त्यांना साळ (साळींदर) याची शिकार करण्याची संधी आली. त्यावेळी  साळ एका ठिकाणी असताना आनंद गावडे हा बंदूक रोखून धरून होता, त्याच वेळी संतोष गोवेकर हा त्या सावजाला हाकलण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी शिकार करण्यासाठी रोखलेल्या बंदुकीतून गोळी झाडली असता सावजाला हाकलण्याच्या प्रयत्नात संतोष गोवेकर याच्यावरच नेम लागल्याने त्याच्या डाव्या बाजूने गोळ्या (मुनीसावं)  लागल्याने तो मृत झाला.  

रात्री घडलेल्या या प्रकाराची  माहिती आनंद गावडे यांनी आपल्या मित्राला फोनवरून दिल्यानंतर घटनास्थळी लोक दाखल झाले, त्यानंतर जखमी संतोष गोवेकर याला उचलून डिचोली इस्पितळात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर सुमारे दहा वाजता पोलिसांना माहिती देण्यात आली. आनंद गावडे याने डिचोली पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच तो बंदुकीसह २ काडतुशीही पोलिसांकडे सुपूर्द केल्या.

या संदर्भात गोवेकर यांचा पुतण्या सुशांत गोवेकर याने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंदवतना आनंद यशवंत गावडे याला अटक केली आहे. डिचोली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय  तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवला आहे.दरम्यान डिचोली पोलिसांनी आज दुपारी घटनास्थळी भेट दिली असता रक्ताने माखलेला शर्ट त्यांना आढळला तसेच त्यात खिशात दोन काडतूशी सापडल्या. यावेळी गोवा फॉरेन्सिक मोबाइल वाहनही पाचहरण करण्यात आली होती. त्यांनी रक्ताचे नमुने व ठसे गोळा केले व इतर ठसे घेतले आहेत.

पोलीस अधीक्षक उत्कृस्ट प्रसून, उपाधीक्षक गुरुदास गावडे, निरीक्षक संजय दळवी, प्रसाद पाळणी, अक्षय तिरोडकर, प्रसाद वायंगणकर, गौरव वायंगणकर, सदानंद मळीक,  किशोर सिनारी, दिपेश आदींनी तपासात सहकार्य केले. वनधिकारी विवेके गोवेकर यांनीही या ठिकाणी भेट दिली.  

टॅग्स :goaगोवाDeathमृत्यू