शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
4
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
5
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
6
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
7
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
8
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
9
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
10
PM मोदींनी नारायण राणेंना मंत्रिमंडळातून का वगळलं? पत्राचा उल्लेख करत विनायक राऊतांचा मोठा दावा
11
"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज
12
मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
13
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
14
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
15
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
16
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
17
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
18
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
19
Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

विरोधक संतापले! लक्षवेधी सूचनेवरून सभापतींसमोर धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 8:04 AM

दीड तास विधानसभेचे कामकाज तहकूब

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी एल्टन डिकॉस्टा यांच्या माफीनाम्यावरुन सभागृहात गोंधळ घातल्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे काल, सोमवारी विरोधकांच्या गदारोळामुळे दीड तास कामकाज तहकूब करावे लागले. सरकार वारंवार लक्षवेधी सूचना टाळत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील हौदात धाव घेतली.

यावेळी सभापती विरोधकांना शांत राहण्यास सांगत होते मात्र, गदारोळ सुरूच राहिल्याने अखेर तवडकर यांनी कामकाज २:३० वाजेपर्यंत तहकूब केले. दोन लक्षवेधी सूचना सरकारला देण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले. आम्हाला दोनपैकी एक लक्षवेधी सूचना मिळायला हवी होती, अशी त्यांची मागणी होती.विद्याप्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणाऱ्या धोक्यांसंदर्भात शून्य तासाला विषय मागण्याची परवानगी मागितली होती. तीदेखील दिली नाही. एकंदरीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. महत्त्वाचे विषय आम्हाला मांडू देत नाही, हा आमच्यावर अन्याय आहे, अशी मागणी करत सातही विरोधी आमदार थेट सभापतींच्या हौदात गेले.

समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या आमदारांची एक लक्षवेधी सूचना चर्चेला घ्यावी, अशी चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाली नाही. युरी आलेमाव यांचे म्हणणे ऐकून घेत सभापतींनी विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांनी याची दखल घ्यावी, अशी सूचना केली होती. पण या सूचनेला न जुमानता आलेमाव थेट उठून सभापतीच्या हौदाकडे गेले. त्यांच्यापाठोपाठ विजय सरदेसाई, कार्ल्स फेरेरा, वेंझी व्हिएगश, कुन सिल्वा, एल्टन डिकॉस्टा वीरेश बोरकर हेही आपली जागा सोडत हौदाकडे पोहचले होते.

... अन् युरी उठले

विधानसभेच्या आजच्या कामकाज सूचिवर संकल्प आमोणकर व सांताक्रूझचे रुडॉल्फ फर्नाडिस यांच्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा होणार असल्याचे नमूद केले होते. शून्य तास संपल्यानंतर सभापतींनी लक्षवेधी सूचना पुकारल्यावर विरोधी पक्षनेता युरी आलेमाव उठले आणि आम्हाला एकही लक्षवेधी सूचना देण्यात येत नाही, असे बोलत हल्लाबोल केला. 

टॅग्स :goaगोवाVidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभा