नारायण गावस, पणजी : पर्यटन हे गोव्याचे सर्वात माेठ आर्थिक बळ देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात राेजगाराच्या संधी माेठ्या आहेत. येत्या २ ते ३ वर्षात पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्या तयार होऊ शकतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. बुधवारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटन मंत्री रोहन खंवटे, टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शहा व पर्यटन खात्याचे अधिकारी व या क्षेत्रातील अन्य भागधारक उपस्थित होतेगोव्यात प्रत्येकाने सरकारी नाेकरीच्या मागे लागू नये. जर आपल्याकडे कला कौशल्य तसेच काम करण्याची इच्छा असेल तर कुठेही काम मिळू शकते. गाेवा हे पर्यटन राज्य असल्याने या क्षेत्रात खूप संधी आहे. या संधीचा लाभ बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.
सरकारने मागील २ वर्षात अनेक विकासकामे केली आहे. मनाेहर आंतराष्ट्रीय विमानतळ त्याचाचा एक भाग आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्र वाढत आहे. आता पुढच्या महिन्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. यामुळे देश विदेशातील पर्यटक येणार आहेत. जी २० परिषदेमुळे अनेक प्रतिनिधी गाेव्यात आले होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले- सरकार पर्यटन क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण काहीजण याचे राजकारण करत आहेत. सरकार गोवेकरांचा धंदा काढून दिल्लीकरांना देत आहे, असा आरोप करत आहेत. पण, असा आरोप करणाऱ्या लोकांनीच दिल्लीकरांना स्वतःच्या जमिनी विकून टाकले आहेत, असे आरोप पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले आहे.- पर्यटन क्षेत्रात नवीन बदल आणण्याचा सरकारचा प्रयत्न सर आहे. पण त्याला प्रत्येकवेळी विरोध करण्यात येतो. टॅक्सीचालकांसाठी टॅक्सी ॲप आणला यालाही विराेध झाला. यामध्येही राजकारण आणत आहेत. सरकार गोवेकरांचा धंदा काढून दिल्लीकरांना देत नाही प्रथम प्राधान्य हे स्थानिकांना दिले जात आहे. काही लोक सरकारवर विनाकारण अरोप करत आहे. असा आरोप करणाऱ्या लोकांनीच दिल्लीकरांना आपल्या जमिनी विकून टाकल्या आहेत, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
पर्यटन खाते समुद्र किनाऱ्याच्या पलीकडीच्या पर्यटनावर भर देत आहे.. यात ग्रामीण, पर्यावरण, जंगल, अध्यात्म, आरोग्य अशा विविध क्षेत्रांचा समावेश केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे विकासाचे ध्येय गाठण्यासही मदत होते, असे मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले आहे.