पणजी : राज्यात ८ ते १३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट मध्ये यंदा नॅशनल एचआरडी नेटवर्क (एनएचआरडीएन) पुणे विभागाच्या सहकार्याने कॉर्पोरेट पॅव्हेलियन आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित भारतातील पहिलाच सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय उत्सव ठरेल.
कॉर्पोरेट पॅव्हेलियनमध्ये खालील उपक्रमांचा समावेश
विविधता आणि सर्वसमावेशक वॉकथॉन: हा उपक्रम जागरुकता वाढविण्यात, मतभेदांना आलिंगत एकात्मता वाढविण्यास मदत करेल.
सर्वसमावेशक उत्पादन आणि सेवा प्रदर्शन : सरकारी प्रतिनिधी, कॉर्पोरेशन आणि सर्वसमावेशक उत्पादने, सेवा आणि सर्वोत्तम पद्धतींबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे.
विचार नेतृत्व व्यासपीठ: तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील पॅनल चर्चेच्या आधारे विविध क्षेत्रांतील आव्हाने, सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती आणि विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांचा शोध.
रोजगार साहाय्य: दिव्यांगासाठी अनुरूप कौशल्य विकास कार्यक्रम, नोकरीत सामावण्यासाठी सहाय्य, नोकरी देणाऱ्यांसाठी संवेदना प्रशिक्षण आणि नेटवर्किंगसह रोजगार संधी
स्पीडो मॉनिटरिंग: हा कार्यक्रम संभाव्य विविधतेच्या उमेदवारांना औद्योगिक नेत्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन मिळविण्यास मदत करेल.अल्प कालावधीत अनेक मार्गदर्शकांची ओळख त्यामुळे उमेदवारांना होईल आणि ते त्वरित मदत मिळवू शकतील.
एनएचआरडीएन ही एक ना नफा तत्त्वावरील संस्था असून मनुष्यबळ विकास संबंधी देशातील सर्वात मोठे नेटवर्क त्यांच्याजवळ आहे. १९८७ साली स्थापन झालेल्या या संस्थेत सध्या २०००० सदस्य असून भारत, सिंगापूर आणि दुबईमध्ये ३७ विभाग आहेत. पुणे विभागाची स्थापना १९८९ साली झाली आणि आतापर्यंत त्यांनी उत्कृष्ट योगदानाबद्दल ४ पुरस्कार जिंकले आहेत.
दिव्यांग समूह, बिगर सरकारी संस्था आणि कॉर्पोरेट्स जे डीईआयबीसाठी काम करत आहेत, एचआर व्यावसायिक, डीईआयबी प्रॅक्टिशनर्स, व्यावसायिक, डीईआयबी, विद्यार्थी आणि सहयोगींना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. यासाठी नोंदणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा - च्या https://purplefest.esg.co.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.