शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

संघटनेच्या फसव्या नियोजनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:29 AM

कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी ही संबंधित फेडरेशन तसेच स्थानिक संघटनेची असते.

पणजी : कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी ही संबंधित फेडरेशन तसेच स्थानिक संघटनेची असते. असे असताना फसव्या नियोजनचा फटका खेळाडूंना बसल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री गोव्यात घडली. २४व्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आलेल्या विविध राज्यांतील खेळाडूंना हॉटेल्सची बिले न दिल्याने हॉटेलचालकांनी रोखून धरले होते. यामुळे काहींच्या रेल्वे चुकल्या, तर काहींना मानसिक त्रास सहन करावा लागला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले होते. अखेर खेळाडूंची सुटका करण्यात आली. जवळपास ४०० हून अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.सुरुवातीला ही स्पर्धा पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडियमवर होणार होती. परंतु, काही कारणामुळे ऐनवेळी ती बीपीएस स्पोटर््स क्लब-मडगाव येथे ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली. स्पर्धेसाठी गोवा किक बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष मंजुनाथ तंगडगी यांनी भारतीय किक बॉक्सिंग संघटनेशी (आयएकेओ) पत्रव्यवहार केला होता. यावर आयएकेओचे अध्यक्ष एस.एस. हरिचंद्रन यांनी स्पर्धेसाठी मान्यता दिली. आएकेओकडून स्पर्धेसाठी जवळपास ६ लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यात खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था याचा समावेश होता. मात्र, स्थानिक अध्यक्ष मंजुनाथ यांनी हॉटेल्सची बिले दिली नसल्याने खेळाडूंना हॉटेल सोडता आले नाही, असे भारतीय किक बॉक्सिंग संघटनेचे सचिव प्रदीप शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सचिव प्रदीप शिंदे यांनी पुढे म्हटले की, ‘यजमान म्हणून अध्यक्ष मंजुनाथ त्यांच्यावर स्पर्धेची जबाबदारी होती. आमच्याकडून आम्ही संघटनेला आर्थिक मदतही केली होती. खेळाडूंना रोखून धरल्याचे कळताच मी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्याचप्रमाणे, ‘बिले देण्याची हमी दिल्यानंतर खेळाडूंची सुटका करण्यात आली.’ असेही शिंदे म्हणाले. या संदर्भात मंजुनाथ यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.>स्थानिक संघटनेवर निलंबनाची कारवाई?खेळाडूंना झालेल्या त्रासास स्थानिक संघटना कारणीभूत आहे. त्यांनी करारानुसार स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळली नाही. त्यांच्यामुळे खेळाडूंना त्रासात पडावे लागले. त्यांनी आमच्याकडे स्पर्धेचा प्रस्ताव पाठविला होता. सर्व अटी मंजूर करीत आम्ही ही स्पर्धा गोवा किक बॉक्सिंगकडे सोपविली.खेळाडूंच्या भोजन आणि निवासाची जबाबदारी याच संघटनेची होती. मात्र, त्यांनी हॉटेल्सची बिले अदा केली नाहीत. त्यामुळे खेळाडूंना त्रास झाला. या गंभीर प्रकरणाबाबत आम्ही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहोत, तसेच आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे, असे प्रदीप शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :boxingबॉक्सिंग