शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

म्युझियम ऑफ गोवा येथे दिव्यांगासाठी 'द इंक' कला प्रदर्शनाचे आयोजन

By समीर नाईक | Published: June 18, 2024 2:23 PM

हे कला प्रदर्शन विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी असून ते दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य आयुक्त कार्यालयाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले आहे.

पणजी: पिळर्णतील म्युझियम ऑफ गोवा येथे 'द इंक' नावाचे कला प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. हे कला प्रदर्शन विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी असून ते दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य आयुक्त कार्यालयाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले आहे. एनएबल इंडिया आणि इंटरनॅशनल पर्पल फेस्ट गोवा या दोन ना-नफा सरकार नियुक्त संस्था सहकार्यात मदत करणार. लेखिका आणि कला सल्लागार समीरा शेठ प्रदर्शनाच्या क्युरेटर आहेत.

मोग संग्रहालयाच्या प्रख्यात स्थळावर हे प्रदर्शन आयोजित केले जाईल. दिव्यांग कलाकारांनी प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी त्याचे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन मोगतर्फे यावेळी करण्यात आले आहे. सहभाग प्रक्रिया आता सुरु झाली असून दि. २३ जून २०२४ ही प्रस्ताव ठेवण्याची अंतिम अंतिम मुदत आहे.

दिव्यांग समुदायातील उल्लेखनीय सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी 'आर्ट इंक' सोबतच्या या पहिल्यावहिल्या समावेशक कला कार्यक्रमात सामील होण्यास आम्ही उत्सुक आहोत. हा उपक्रम दिव्यांग कलाकारांना एक मौल्यवान व्यासपीठ प्रदान करतोच, तसेच सर्वांना आपल्याच्या सांस्कृतिक परिदृश्यात योगदान देण्यास आणि आनंद घेण्यास प्रोत्साहित करणारे वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या बांधिलकीवरही प्रकाश टाकतो, असे दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी यावेळी सांगितले.

राज्य दिव्यांग व्यक्ती आयोग, गोवा यांच्या सहकार्याने मोग येथे अशा प्रकारचे हे पहिले कला प्रदर्शन, 'आर्ट इंक' दिव्यांग व्यक्तींच्या कलाकृतींचे प्रदर्शन करेल. हे प्रदर्शन कलात्मक आकांक्षा वाढवणारे आणि कला आणि अपंगत्वाविषयी चर्चा करण्यास अनुमती देणारे स्थान म्हणून काम करेल, असे मोग ऑपरेशनल प्रमुख आणि पिळर्णतील चिल्ड्रन्स आर्ट स्टुडिओच्या सह-संस्थापक शारदा केरकर म्हणाल्या.

काळजीपूर्वक क्युरेटोरियल प्रक्रियेनंतर, निवडलेल्या उमेदवारांना ३० जूनपर्यंत एक पुष्टीकरण ईमेल प्राप्त होईल आणि त्यांना त्यांची कलाकृती ६ आणि ७ जुलै रोजी मोग येथे किंवा उत्तर आणि दक्षिण गोव्यातील निर्दिष्ट ड्रॉप ऑफ स्थळावर सोडावी लागतील. पुष्टी झालेल्या ईमेलमध्ये या स्थळांची नवे असणार. निवडलेल्या कलाकारांना अधिकाधिक अभ्यागत आणि संभाव्य खरेदीदारांसमोर त्यांची कला दाखवून, व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. कलाकारांना त्यांच्या कलाकृतींच्या किंमतीसह प्रभावीपणे मदत केली जाईल. विक्रीद्वारे व्युत्पन्न होणारी सर्व रक्कम कलाकाराकडे जाईल. अर्जदार त्यांचे प्रस्ताव https://linktr.ee/mogcuration या लिंकवर देऊ शकतात, असेही केरकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा