शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

गोवा आयडीसी तर्फे २१ रोजी ओएनडीसीबाबत कार्यशाळेचे आयोजन

By समीर नाईक | Updated: May 18, 2024 15:06 IST

ओएनडीसी हे केवळ एखादे मोबाईल एप्लिकेशन नाही, बाजारातील मध्यस्थ नाही किंवा सॉफ्टवेअर म्हणून कार्यरत नाही.

पणजी:  गोवा औद्योगिक विकास महामंडळ (गोवा-आयडीसी)द्वारे राबवण्यात येत असलेल्या आयडीसी-कनेक्ट २०२४ या उपक्रमाअंतर्गत वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) या शासकीय खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळा २१ मे रोजी फर्न केसरवाल, वेर्णा येथे होणार आहे. विनामूल्य असलेली ही कार्यशाळा गोवा-आयडीसीच्या वसाहतीमधील सर्व उद्योगांसाठी खुली आहे. 

ओएनडीसी कार्यशाळेचा उद्देश सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी डिजिटल कॉमर्सच्या माध्यमातून क्रांती घडवून आणणे हा आहे. या कार्यशाळेत व्यावसायिक कामकाज प्रभावीपणे कसे करावे, डिजिटल मार्केटप्लेसमध्ये सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांच्या सहभागामधील आव्हानांवर कशी प्रकारे मात करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

भारतामध्ये मुक्त ई-व्यापार पद्धतीचा प्रसार करणे आणि ई-व्यापार प्रणाली लोकशाही तत्वावर कार्यरत राहण्याचे सुनिश्चित करणे या उद्देशाने भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी)द्वारे ओएनडीसी ही खाजगी, ना-नफा तत्वावर कार्यरत सेक्शन-८ कंपनी स्थापन करण्यात आली आहे. ओएनडीसी हे केवळ एखादे मोबाईल एप्लिकेशन नाही, बाजारातील मध्यस्थ नाही किंवा सॉफ्टवेअर म्हणून कार्यरत नाही. तर विविध छोटे-मोठे उत्पादक, वितरक, व्यावसायिक, किरकोळ विक्रेते यांच्या दरम्यान मुक्त व्यावसायिक देवाणघेवाण करण्याबाबत आणि या बाजारघटकांमध्ये एक दुवा बनण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणालींचा संच म्हणजे ओएनडीसी आहे. सर्वसमावेशक ई-कॉमर्स परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने ओएनडीसीची स्थापना करण्यात आली आहे.

आयडीसी-कनेक्ट २०२४च्या माध्यमातून या कार्यशाळेच्या आयोजनाबाबत उत्साह व्यक्त करताना गोवा-आयडीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक म्हणाले, “उद्योगांना भूखंड उपलब्ध करणारी संस्था अशी भूमिका मर्यादित न ठेवता, गोवा राज्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी एक प्रेरक म्हणून काम करण्यासाठी गोवा-आयडीसी कटिबद्ध आहे. ई-कॉमर्स प्रणालीतून बाजारातील नवनव्या संधी उपलब्ध करत ओएनडीसी प्लॅटफॉर्म गोव्यातील सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांसाठी व्यवसायाचा पूर्ण परिपेक्ष बदलवून टाकणारा असा ठरू शकतो. या कार्यशाळेचा गोव्यातील अनेक उद्योग-व्यवसायांना लाभ होईल असा मला विश्वास आहे. गोवा-आयडीसीच्या वसाहतींमधील सर्व उद्योगांना अशा सुविधांचा लाभ मिळावा या हेतूने गोवा-आयडीसीद्वारे यंदा अशा आणखी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे असेही प्रविमल अभिषेक यांनी सांगितले.