शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पणजीत आंदोलक खाण अवलंबितांनी पावणेतीन तास दोन्ही मांडवी पूल रोखले, पोलिसांकडून अखेर लाठीहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 7:07 PM

खाण अवलंबितांनी सोमवारी दोन्ही मांडवी पूल रोखून जनतेला तब्बल पावणेतीन तास वेठीस धरले.

पणजी : खाण अवलंबितांनी सोमवारी दोन्ही मांडवी पूल रोखून जनतेला तब्बल पावणेतीन तास वेठीस धरले. राजधानी शहराच्या प्रवेशव्दारावर कोंडी करण्यात आल्याने अनेक वाहने यात अडकली तसेच विद्यार्थ्यांचीही परवड झाली. रस्ता मोकळा करण्यास आंदोलक तयार नव्हते. पाच वाहनांची नासधूस करण्यात आली तसेच पोलिसांवर दगडफेक केली त्यात ५ पोलिस जखमी झाले. आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने अखेर पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. यात ३ आंदोलक  जखमी झाले. सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली. न्यायदंडाधिऱ्यांनी दुपारी २.४५ च्या सुमारास लाठीहल्ल्याचा आदेश दिल्यावर पोलिसांनी अक्षरश: आंदोलकांची धुलाई केली यात काही बघ्यांनाही लाठीचा प्रसाद खावा लागला. आमदार नीलेश काब्राल आंदोलकांमध्ये होते. महाराष्ट्रातून पोलीस कुमक मागविली होती. या पोलिसांनी आमदार काब्राल यांना ओळखले नाही. काब्राल यांच्याही उजव्या हाताला लाठी लागली. लाठी हल्ल्यात ट्रकमालक संघटनेचे नेते महेश गांवस तसेच अन्य जखमी झाले. काहींची डोकी फुटली त्यामुळे रक्ताळलेल्या अवस्थेत त्यांना तेथून हलवावे लागले. जुन्या मांडवी पुलाजवळ लाढीहल्ला झाल्यावर आंदोलक सैरावैरा पळत सुटले काहीजण लोखंडी कुंपणावरुन उड्या टाकून बाजुच्या आंबेडकर मैदानात पळाले तर काहीजणांनी कदंब स्थानकाच्या दिशेने धूम ठोकली. पोलिसांनी पाठालाग करुन एकेकाला लाठीने चोप दिला व नंतर जीपगाड्यांमध्ये कोंबून पोलिस स्थानकात रवानगी केली. पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यावेळी जातीने हजर होते आणि पोलिसांना आवश्यक त्या सूचना देत होते. तत्पूर्वी ट्रकमालक तसेच अन्य अवलंबित मोठ्या संख्येने सकाळी ११ च्या सुमारास येथील बसस्थानकासमोर क्रांती सर्कलजवळ जमले. तेथून खरे तर आधी ठरल्याप्रमाणे ते आझाद मैदानावर जाणार होते परंतु अचानक पवित्रा बदलून आधी जुना पूल आणि नंतर नवा मांडवी पूल आंदोलकांनी अडविला. राष्ट्रीय महामार्ग १७ अ खाली हे पूल येतात. महामार्ग ठप्प झाल्याने दोन्ही बाजुची वाहने अडकून पडली आणि बसस्थानकातून बसगाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत किंवा आतही येऊ शकल्या नाहीत. प्रवाशांचे यामुळे अतोनात हाल झाले. रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या दुचाकीस्वारांना रखरखित उन्हात तासन्तास ताटकळत रहावे लागले. कुजिरा शाळा संकुलातही वेगवेगळ्या शाळांची सातशे ते आठशे मुले बसेस येऊ न शकल्याने अडकून पडली. खाणी विनाविलंब चालू कराव्यात या मागणीसाठी आंदोलन हातात फलक घेऊन सरकारविरुध्द जोरदार घोषणाबाजी करीत होते. निषेध म्हणून त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारचे व खाणविरोधी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांचे पुतळे जाळले. एका सरकारची जीपगाडी पंक्चर केली. अनेक दुचाकीधारकांना धाकदपटशा दाखवत दुचाक्यांच्या चाव्या काढून घेतल्या. तसेच एका दुचाकीचीही नासधुस केली. वाहनांना आग लावण्याची भाषाही आंदोलक करु लागले होते. राज्य पोलिस, आयआरबी, केंद्रीय राखीव पोलिस दल तसेच महाराष्ट्र पोलिस असा प्रचंड फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आला होता आणि त्यांच्या उपस्थितीतच हा सर्व प्रकार चालला होता. उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन् आंदोलकांना वारंवार रस्ता मोकळा करण्याची विनंती करीत होत्या परंतु जमाव त्यांचे काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. यामुळे आंदोलक आणि मोहनन् यांच्या शाब्दिक चकमकी झडण्याचे प्रकारही घडले. आंदोलक काबूत येत नसल्याचे व अधिकच हिंसक बनत असल्याचे पाहून अखेर लाठीहल्याचा आदेश देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ७ फेब्रुवारी रोजी आदेशात गोव्यातील सर्व ८८ खाण लीज रद्द करुन त्यांचा लिलांव करण्याचा आदेश सरकारला दिला आहे. १६ मार्चपासून खाणी बंद झालेल्या असून खाण अवलंबित ट्रकमालक, बार्जमालक, मशिनरीमालक यांचा खाणी लवकरात सुरु केल्या जाव्यात अशी मागणी आहे.