शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

पणजी ओडीपीला कोर्टात आव्हान

By admin | Published: February 10, 2017 1:23 AM

पणजी : महापौर सुरेंद्र फुर्तादो व इतर १५ नगरसेवकांनी पणजीच्या बाह्य विकास आराखड्यास (ओडीपी) आव्हान दिले असून मुंबई उच्च

पणजी : महापौर सुरेंद्र फुर्तादो व इतर १५ नगरसेवकांनी पणजीच्या बाह्य विकास आराखड्यास (ओडीपी) आव्हान दिले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उत्तर गोवा पीडीएसह अन्य प्रतिवाद्यांना नोटिसा बजावून दोन आठवड्यांच्या आत उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यास बजावले आहे. पत्रकार परिषदेत फुर्तादो यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत सत्ताधारी गटातील सहकारी नगरसेवकही उपस्थित होते. या आव्हान याचिकेत मुख्य सचिव, मुख्य नगर नियोजक, उत्तर गोवा पीडीए तसेच महापालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले आहे. हा ओडीपी आम्ही मानत नाही आणि महापालिका बांधकामांना परवाने देणार नाही, असे फुर्तादो यांनी ठणकावले आहे. गेली तीन वर्षे या सरकारने महापालिकेची विकासकामे रोखली, अर्थसाहाय्य दिले नाही तसेच प्रत्येक गोष्टीबाबत अंधारात ठेवले आणि अक्षरश: छळ केल्याचा आरोप त्यांनी केला. फुर्तादो म्हणाले की, पणजीच्या पोटनिवडणुकीत सिध्दार्थ कुंकळयेकर यांनी शहरात आठ मजली इमारती आणणार, असे जाहीर केले नव्हते. पणजी ओडीपीत करण्यात आलेल्या पुढील काही तरतुदींना आक्षेप घेतला जात असून याचिकेत याच बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे व्यावसायिक विभागात स्पेशल कमर्शिलय झोनची खास तरतूद करून ३२ मीटर उंचीपर्यंत इमारतींना मार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र, मोठ्या इमारती आल्यास वाहनसंख्या वाढणार असूनही रस्त्याची रुंदी मात्र १0 मीटरच प्रस्तावित आहे. या विभागात पुढचा सेटबॅक ५ मीटर सुचविण्यात आला आहे. निवासी विभागात स्पेशल सेटलमेंट झोनमध्ये खास तरतूद करून इमारतीची उंची २४ मीटरपर्यंत देण्यात आली आहे. मात्र, केवळ ६ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. मिरामार येथील लेक व्ह्यू कॉलनीतही सेटलमेंट झोन बदलून सी वन (कमर्शियल वन) झोन करण्यात आला आहे. नीना पिंटो कॉलनी परिसरात कमर्शियल वन विभाग दाखवण्यात आला आहे. या भागात ज्येष्ठ नागरिकच जास्त प्रमाणात राहतात. त्यामुळे हा विभाग बदलावा तसेच रस्ते १0 ते १५ मीटर रुं दीचे असावेत अशी तरतूद करण्याची मागणी आहे. जलसफरी घडवून आणणाऱ्या बोटींचे तिकीट काउंटर व तेथील खुली जागा व्यावसायिक विभाग म्हणून सी-३ विभागात आणली आहे. चटई निर्देशांकात (एफएआर) बेसुमार वाढ करण्यात आली आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पणजी शहरात सेटलमेंट (निवासी) विभागात सध्याचा एफएआर एस- २ - 0.८0, एस- १ - १00 असा होता, त्या जागी आता स्पेशल सेटलमेंटची तरतूद करण्यात आली असून २00 एफएआर दिलेला आहे. कमर्शियल (व्यावसायिक) विभागात सी-२ - १.५0, सी- १ - २00 असा एफएआर होता. त्याजागी स्पेशल सेटलमेंटची तरतूद करून आता ३00 एफएआर दिलेला आहे. या सर्व तरतुदींना फुर्तादो व सहकारी नगरसेवकांचा विरोध आहे. याआधी हेरिटेज अ‍ॅक्शन ग्रुप ही संघटनाही पणजी ओडीपीविरोधात न्यायालयात गेलेली आहे. (प्रतिनिधी)