पणजी: रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या २० हजर रुपयांपर्यंत २ हजरांच्या नोट बदलून घेण्यासाठी फॉर्म भरावा लागणार नाही असे जाहीर करणाऱ्या अधिसूचनेला राज्यातील बहुतेक सर्वच बँकांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. एक नोट बदलणयासाठीही बँक अधिकारी रकाने भरून देण्याची मागणी करीत आहेत. या विषयी लोकांच्या अनेक तक्रारी असून वृत्तपत्रांनाही बँकात होणाऱ्या प्रकारांची माहिती देणारे फोन केले जात आहेत. फॉर्म भरून दिल्या शिवाय एकही नोट बदलून दिली जाणार नाही अशी भूमिका बँक अधिकारी घेत आहेत. भारतीय रिझर्व बँकेच्या अधिसूचनेविषयी सांगितलं असता ती अधिसूचना केवळ स्टेटबँक ऑफ इंडिया या एकाच बँकला लागत असल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
दरम्यान स्टेटबँकमध्येही जुन्या नोटा घेून नवीन नोटा घेण्यासठी फॉर्म भरून देण्यास सांगत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. नोटा बदलून देण्याचे काम बँकांकडे सोपविण्यात आले असले तरी बँकांच्या असहकारामुळे पूर्ण यंत्रणाच बिघडली आहे. यामुळे लोकांना त्रास सोसावा लागत आहे.