शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पॅनकार्ड क्लबचे गोव्यातील कार्यालय गायब, कार्यालय स्थलांतर झाल्याचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 9:06 PM

पणजी : आलिशान हॉटेल, रिसॉर्टचे प्रलोभन दाखवून सामान्यांच्या पैसे लुटणा-या पॅनकार्ड क्लबचे गौडबंगाल पुढे आले आहे.

- विलास ओहाळपणजी : आलिशान हॉटेल, रिसॉर्टचे प्रलोभन दाखवून सामान्यांच्या पैसे लुटणा-या पॅनकार्ड क्लबचे गौडबंगाल पुढे आले आहे. सात हजार 35 कोटी रुपयांचा घोटाळा असलेल्या या पॅनकार्ड क्लबचे गोव्यातील राजधानीतील कार्यालय चार-पाच महिन्यांपूर्वीच बंद झालेल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या कार्यालयाला कारवाईची कुणकुण लागल्यानेच येथून पलायन केले असावे, असा अंदाज आहे.मुंबई शेअर बाजारात प्रविष्ट असलेल्या पॅनारॉमिक समूहाची उपकंपनी असलेल्या पॅनकार्ड क्लबमध्ये देशभरातील 50 लाख गुंतवणूकदारांचा पैसा त्यात गुंतलेला आहे. या कंपनीच्या मुसक्या मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आवळत सहा संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सात हजार 35 कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. देशभरातील प्रमुख शहरांतून मोठ-मोठय़ा उद्योजक, अधिकारी वर्गाला या क्लबने आपले सावज बनविले आहे. गोव्यातही अनेक मासे या क्लबच्या गळाला लागले असणार आहेत.गोव्यातील किती गुंतवणूकदारांनी आपला पैसा या क्लबमध्ये गुंतविलेला आहे, हे अद्याप कळाले नाही. संकेतस्थळावर गोव्यातील पणजीमध्ये पॅनकार्ड क्लबचे 18 जून रस्त्यावरील सपना रेजन्सीमध्ये बॅरोन शोरूमच्या वर, बी-4, दुसरा मजल्यावर हे कार्यालय असल्याचा पत्ता आहे. या कार्यालयाचा लोकमतने शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते कार्यालय काही मिळाले नाही. आजूबाजूच्या कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर क्लबचे कार्यालय पाच-सहा महिन्यांपूर्वी येथून दुसरीकडे स्थलांतर झाल्याचे सांगण्यात आले.सपना रेजन्सीमधील खासगी कार्यालयातील एका महिला कर्मचा-याने ते कार्यालय धेंपा हाऊसमध्ये स्थलांतर झाल्याचे सांगितले. बांदोडकर मार्गाशेजारील मार्केट परिसरातील धेंपो हाऊसमध्ये हे कार्यालय स्थलांतरित झाले आहे का? हे पाहण्यात आले. तेथेही असे काही कार्यालय आले नसल्याची खात्री झाल्यानंतर पाटो येथील धेंपो टॉवर्समध्ये हे कार्यालय स्थलांतर झाले असावे का, याचीही खात्री करण्यात आली. मात्र, तेथेसुद्धा हे कार्यालय स्थलांतरित झाले नसल्याचे समोर आले.संकेतस्थळावर पॅनकार्ड क्लबचे कार्यालय सुरू होण्याची वेळ 9.30 ते सायंकाळी 6 अशी वेळ अशी देण्यात आली आहे. त्याचबरोबर याशिवाय 0832-2231173 किंवा 2231174 असा दूरध्वनी क्रमांक दिला आहे, त्यावर संपर्क साधल्यानंतर कृपया आपला नंबर तपासून पहा असे दूरध्वनीवर किंवा मोबाईलवर सांगण्यात येते. गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने मुंबईत लवकरच ईओडब्ल्यू कारवाई करणार याची कल्पना आल्याने येथील कार्यालयानेही राजधानीतून पळ काढला असावा, असा अंदाज आहे.