पणजी : राज्यातील इंग्रजी प्राथमिक शाळांना दिले जाणारे शासकीय अनुदान थांबवावे आणि गेल्या महिन्यात रास्ता रोको करणाऱ्या फोर्स संघटनेशी संबंधित व्यक्तींविरुद्ध खटले भरले जावेत, अशी मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंच करत असून गुरुवारी पणजीत मंचतर्फे पहिला मोर्चा काढला जाणार आहे. मात्र, २०१२ साली मंचसोबत आंदोलन करणाऱ्या भाजपने आता वेगळी भूमिका घेतली आहे. सध्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान मिळते ते सुरूच ठेवले जावे, अशी मागणी भाजपने गुरुवारी नव्याने केली. भाषा सुरक्षा मंचच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व मराठी व कोकणी प्रेमी दुपारी साडेतीन वाजता येथील महालक्ष्मी मंदिराच्या आवारात जमणार आहेत. त्यानंतर पणजीत मोर्चा काढला जाणार आहे. यापुढील काळातील आपल्या आंदोलनाची रूपरेषा भारतीय भाषा सुरक्षा मंचकडून लवकरच ठरविली जाणार आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी गुरुवारी येथे (पान ९ वर)
भाषा सुरक्षा मंचचा आज पणजीत मोर्चा
By admin | Published: August 07, 2015 2:07 AM