पणजी: कोवीड -१९ महामारीमुळे लांबणीवर टाकाव्या लागलेल्या १२ वीच्या ऊर्वरीत विषयांच्या परीक्षा आता बुधवारपासून सुरू होत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन सााजिक अंतर राखूनच आणि विद्यार्थ्यांना ने आण करण्याची व्यवस्था शालान्त मंडळाला करावी लागणार आहे. तसेच परीक्षेला पहिल्यांदाच विद्यार्थी मास्क घालून बसणार आहेत.
परीक्षा केंद्रात पहिल्यांदाच मास्क, सेनीटायझर आणि प्रत्येक विद्यार्थ्यांत किमान १ मीटरचे अंतर राखून परीक्षा दिली जाणार आहे. इतिहासात असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली असल्याचे गोवा शालान्त मंडळाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित परीक्षा केंद्रापर्यत पोहोचविण्याची जबाबदारी विद्यालयाच्या मुख्याद्यापकांवर सोपविण्यात आली आहे. बहुतेक विद्यालयांकडून लावण्यात आलेल्या व्यवस्थेनुसार पालक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत नेणार आहेत आणि स्कूलबसद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचविले जाणार आहे. बुधवारी द्वितीय भाषेचा (मराठी) पेपर, गुरूवारी राज्यशास्त्र तर शुक्रवारी भुगोलाचा पेपर आहे.