पणजी : गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांना पर्याय देण्यावरून भाजपा आमदार व पक्षात दोन गट पडले आहेत. संघटनेतही दोन गट पडले आहेत. भाजपाच्या तीन सदस्यीय केंद्रीय निरीक्षक समितीने रविवारी राजकीय स्थितीचा आढावा घेतला.समितीने आमदारांचे मत स्वतंत्रपणे ऐकले. पर्रीकर यांच्यावर नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. भाजपामधील एका गटाला नवा मुख्यमंत्री हा पक्षातूनच निवडावा, असे वाटते तर दुसऱ्या गटाने बाहेरून नेता आणला तरी त्यांच्या पक्षाचे भाजपामध्ये विलिनीकरण करावे, अशी भूमिका मांडली. सभापती प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आदी निरीक्षकांना भेटले.भाजपामधीलच एखाद्या आमदाराला उपमुख्यमंत्री म्हणून नेमावे आणि त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी द्यावी, असे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले.
पर्रिकरांच्या पर्यायावरून गोवा भाजपात दोन गट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 1:33 AM