शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

भाजपच्या सोयीसाठी आरक्षणात पक्षपात

By admin | Published: September 26, 2015 3:23 AM

पणजी : पालिका प्रभाग आरक्षणात सरकारने पक्षपात केला असून भाजप उमेदवारांना सोयीचे होईल अशीच रचना करण्यात आलेली आहे

पणजी : पालिका प्रभाग आरक्षणात सरकारने पक्षपात केला असून भाजप उमेदवारांना सोयीचे होईल अशीच रचना करण्यात आलेली आहे, असा आरोप प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा पत्रकार परिषदेत म्हणाले, भाजपच्या पायाखालची वाळू सरकत चालल्यानेच आरक्षणातही घोळ घातला गेला. गेल्या निवडणुकीत जो प्रभाग महिलांसाठी राखीव होता तो या वेळीही महिलांकरिताच राखीव ठेवला आहे. मुरगाव पालिकेच्या प्रभाग १७ मधील काही मतदारांची नावे तर प्रभाग २१ मध्ये घातली आहेत. कुटुंबातील काहींची नावे एका प्रभागात, तर काहींची दुसऱ्या प्रभागात घातली आहेत. म्हापसा पालिकेत प्रभाग ७ गेल्यावेळी महिलांकरिता राखीव होता, तो या वेळीही महिलांकरिता राखीव केला आहे. भाजप उमेदवारांच्या सोयीसाठीच हे षडयंत्र करण्यात आले असून सर्व काही सत्ताधारी भाजप आमदारांना हवे तसेच झालेले आहे. अखेरच्या क्षणी प्रभाग राखीवता जाहीर करून कोर्टात जाण्यासही वेळ दिलेली नाही. पक्षाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते ट्रोजन डिमेलो म्हणाले, अनुसूचित जमातींचे आरक्षण ५ टक्क्यांवर आणून त्यांच्यावर अन्याय केला. ओबीसींना २७ टक्के दिलेली राखीवता ही एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवूनच आहे. सत्तेसाठी गरीब, शोषित समाजाला नष्ट करण्यासाठी हे सरकार निघाले आहे. धिरयोंच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान न्यायालयाचा आदेश धुडकावणारे आहे. न्यायालयाची बंदी असतानाही मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पोलीस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर तब्बल चार तास धिरयो चालतात आणि पोलीस कोणतीच कारवाई करीत नाहीत हे काय, असा सवाल करून ट्रोजन यांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी)