ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 24 - संत जॉन बाप्तिस्ता म्हणजेच जुवांव बाप्तिस्ता यांचा जन्मदिवस गोव्यात सांजाव म्हणून साजरा केला जातो. संत जॉन याचाच अपभ्रंश सांजाव असा झाला. गोव्यात शनिवारी हा सांजाव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. मान्सून सुरू झाल्यावर राज्यभरातील ख्रिस्ती बांधवांना वेध लागतात ते 24 जूनच्या सांजावचे.! डोक्यावर काटेरी मुकुट, गळ्यात घुमट व फुलांच्या माळा, हातात माडाचे पिडे (फांदी), व अन्य वाद्ये वाजवित-नाचत-गात लोक गटागटाने फिरतात. राज्यातील विहिरी, तलावात उड्या मारून मौजमस्ती करतात. डोक्यावर गोलाकार आकाराची चक्रे सजवतात. त्यांना कॉपेल म्हणतात. कॉपेल फुलांनी सजवतात. वातावरण आनंदी असते. या आनंदात दिवस कधी संपतो ते कळत नाहीत. निसर्गाला जपण्याचा संदेशही सांजावद्वारे दिला जातो. या दिवशी सासरवाडीला येणा:या जावयाचा मोठा सन्मान केला जातो.
- शिवोलीतील सांजाव
(छाया : जयेश नाईक, शिवोली, गोवा )
- सांत-आंद्रेतील सांजाव
(छाया : किशोर नाईक, सांत-आंद्रे, गोवा )
- ताळगावात कृत्रिम बर्फवृष्टीत जल्लोष
( छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)
- असे वादक सांजावची रंगत वाढवितात.
( छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)
- ताळगाव-पणजी येथे प्रसंगी असे कृत्रिम तळे तयार करतात आणि नाचतात.
( छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)
- ताळगाव-पणजी येथे प्रसंगी असा कृत्रिम पाऊस पाडला गेला.
( छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)
- पर्यटन महामंडळाने पर्यटकांसाठी सांजाव साजरा करण्याची व्यवस्था शनिवारी केली होती.