पणजी: गोव्यात घटकराज दिनापासून म्हणजे ३० मे २०१८ पासून प्लॅस्टीक वापरावरील बंदी पूर्णपणे अंमलात आणली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कांपाल येथे गोवा मुक्तीदिनस सोहळ््यास बोलताना केली केली. स्वच्छ गोवा सुंदर गोवा हा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जेजे करायला हवे आहे ते सर्व काही केले जाईल असे त्यांनी सांगितले.
मुक्तीदिन सोहळ््यास बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ गोवा सुंदर गोवा हे प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते सर्व करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. प्लॅस्टीक बंदीची कडक अंमलबजावणी गोवा घटकराज दिनापासून केली जाणार आहे. त्यासाठी लोकांना पूर्वतयारी करण्यासाठी वेळ मिळावा त्यासाठीच ही पूर्वसूचना देण्यात आली आहे. बºयाच जणांचे प्लॅस्टीकच्या बाबतीत अथर्संबंधही गुंतलेले असतात त्यांनी ही गोष्ट आतापासूनच गांभिर्याने घ्यावी असे त्यांनी सांगितले.
स्वच्छ गोवा सुंदर गोवा चळवळीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे कचरा प्रक्रिया केंद्रे. गोव्यात तीन मोठे कचरा प्रक्रिया प्रकल्प हे त्यासाठीच आहेत, पैकी साळगाव येथील प्रकल्प पूर्णत्वाला आला आहे असे ते म्हणाले. अपघातांची संख्या भंयकर वाढली आहे ती पहिल्या टप्प्यात किमान अर्ध्यावर तरी आणण्यासाठी उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. साधनसुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मांडवीवर तिसरा पूल होताना दिसत आहे. गालजीबागचा पूलही २०१८ च्या अखेरपर्यंत पूर्ण झालेला दिसेल. शिक्षणाच्या क्षेत्रातही साधन सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. महाविद्यालये, प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या बांधकामांचा त्यात समावेश आहे. ५ वर्षात ३० हजार कोटींची विकास कामे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.