शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

नववर्ष स्वागताच्या गर्दीवर पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर; ड्रंक अ‍ॅंन्ड ड्राईव्ह विरोधातही मोहीम

By जितेंद्र कालेकर | Published: December 29, 2023 5:12 PM

सशस्त्र पायी आणि व्हॅनद्वारेही गस्त.

जितेंद्र कालेकर, ठाणे : नववर्ष स्वागताच्या पाटर्या आणि गर्दीवर ठाणे शहर पोलिसांची करडी नजर राहणार असून कोणीही उत्सवाच्या नावाखाली मद्यप्राशन, छेडछेडीसारखे गैरप्रकार करु नयेत, असे आवाहन सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रणासाठी सीसीटीव्ही तसेच ३६ ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचेही त्यांनी सांगितले.

नववर्ष स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोपाच्या निमित्ताने आयोजित हाेणाऱ्या पाटर्यांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केल्याचे कराळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड हेही उपस्थित होते.

३१ डिसेंबर २०२३ रोजी रितसर परवानगीने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी, महत्वाचे चौक तसेच रस्ते, चौपाटी, मैदाने त्याचबरोबर गर्दी जमा होणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांची सशस्त्र पायी आणि मोबाईल गस्त राहणार आहे. याशिवाय, फिक्स पॉईंट तसेच प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गांवर नाकाबंदीचे आयोजन केलेले आहे. महिला व मुलींची छेडछाड, विनयभंग, सोनसाखळी तसेच मोबाईल स्नॅचिंग आदी प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथक, छेडछाड विरोधी पथक, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक नियुक्त केले आहे.याशिवाय, सीसीटीव्हीआणि विविध मोक्याच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरांव्दारेही लक्ष ठेवले जाणार आहे. साध्या वेषातील पोलिसही बंदोबस्तासाठी नियुक्त राहतील. यावेळी १८ युनिट मार्फत ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह विरोधी मोहीमही राबविली जाणार असून ३७ िब्रथ ॲनालायझरद्वारे मदयपी संशयित चालकांची तपासणी केली जाणार आहे.

पाेलिसांच्या सुटयाही रद्दद-

नववर्ष स्वागताच्या बंदोबस्तासाठी पाेलिसांच्या सुटया रद्द केल्या असून स्थानिक पाेलिसांबराेबरच गुन्हे शाखा,आर्थिक गुन्हे शाखा, सायबर, विशेष शाखा, पोलीस मुख्यालय, वाहतुक शाखा जलद प्रतिसाद पथक, पोलीस नियंत्रण कक्ष, अतिक्रमण विरोधी पोलीस पथक, एसआरपीएफसह महिला पोलीस अमलदार तसेच सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांच्यासह माेठा बंदाेबस्त तैनात आहे.

रात्री १२ पर्यंत राहणार ध्वनीक्षेपकाला परवानगी-

ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ पर्यंत परवानगी असून शाकाहारी हटिल, परमिटरूम, रेस्टॉरंट, आॅर्केस्ट्रा बार यांना पहाटे १. ३० ते ५ वाजेपर्यंत परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस