गोव्यात राजकीय हालचालींना वेग; फुटीर गटाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

By किशोर कुबल | Published: September 14, 2022 12:11 PM2022-09-14T12:11:36+5:302022-09-14T12:12:49+5:30

Goa : मुख्यमंत्र्यांच्या दालनात काँग्रेस फुटीर आमदारांबरोबर प्रमोद सावंत यांची चर्चाही झाली. 

Political Movement Speeds Up in Goa; eight congress mla's met the Chief Minister! | गोव्यात राजकीय हालचालींना वेग; फुटीर गटाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

गोव्यात राजकीय हालचालींना वेग; फुटीर गटाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

Next

पणजी : फुटीर काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या दालनात फुटीर काँग्रेस आमदारांबरोबर प्रमोद सावंत यांची चर्चाही झाली. वैध फुटीसाठी दोन तृतीयांश संख्याबळ होत नसल्याने या आठ आमदारांचा भाजप प्रवेश अडला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या फुटीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या. गेल्या दोन दिवसात या हालचालींना वेग आला होता.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी सभापती रमेश तवडकर हे दिल्लीला असल्याने या आठ आमदारांचा हा गट भाजपात विलीन करण्यात येत असल्याचे पत्र विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांना सादर करण्यात आले. केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमांव,  हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा वगळता अकरापैकी अन्य आठ काँग्रेसचे आमदार सभापतींच्या कार्यालयात सकाळीच १० वाजताच पोहोचले होते.

काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याच्या हालचाली गेल्या अनेक दिवसांपासून चालू होता. जुलैमध्ये विधानसभा अधिवेशन तोंडावर असताना दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदारांचे संख्याबळ न झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. परंतु आता आठ आमदार एकत्र आले आहेत. यात संकल्प आमोणकर यांचाही समावेश आहे. संकल्प हे सुरुवातीपासून आपण  काँग्रेसकडे निष्ठावान असल्याचे दाखवत होते. परंतु आता ते फुटीर गटाबरोबर आहेत.

पोलिसांकडून पत्रकारांनाही मज्जाव
काँग्रेसी फुटीर आमदारांचा गट विधानसभेत पोचण्यापूर्वीच पोलिसांनी विधानसभेत संकुलाच्या प्रमुख गेट्स घडविल्या. पत्रकारांनही आत जाऊ दिले नाही. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मंत्रालयात खात्यांच्या कामांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ही परिषद कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनाही प्रवेश मनाई करण्यात आली.

सभापती दिल्लीहून गोव्याकडे
काँग्रेसी फुटीर आमदारांच्या ताज्या राजकीय घडामोडींची माहिती दिल्लीत सभापती रमेश तोडकर यांना देण्यात आली. ते तातडीने दिल्लीहून गोव्याकडे येण्यासाठी निघाले आहेत.

Web Title: Political Movement Speeds Up in Goa; eight congress mla's met the Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.