शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Goa Election 2022: हरण्यासाठीही निवडणुका असतात; गोव्यात पहिल्यांदा पराभूत झाले, ते पुढे मुख्यमंत्री झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 4:40 PM

जे पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले, ते पुढे मुख्यमंत्री झाले अशी अनेक उदाहरणे आहेत. एक निवडणूक हरले म्हणजे सगळे काही संपले असा त्याचा अर्थ मुळीच नसतो.

सदगुरू पाटील

निवडणुका फक्त जिंकण्यासाठीच असतात, असे एक सर्वसाधारण विधान राजकीय पक्षांकडून केले जाते. राजकीय विश्लेषकांनाही तसेच वाटते. जिंकण्यासाठीच लढायचे असते, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण, काहीवेळा निवडणुका हरण्यासाठी देखील असतात हे लक्षात घ्यायला हवे. याच अनुषंगाने हा विश्लेषणाचा एक प्रयत्न.

गेल्या पंचवीस वर्षांत जे आमदार राज्यात निवडून आले, त्यापैकी अनेकजण कोणत्या ना कोणत्या निवडणुकीत पराभूत झाले. अनेकजण पहिल्याच प्रयत्नात पराभूत झाल्याचे दाखले पाहायला मिळतात. मनात जिंकण्याचा निर्धार हवा, पण आपण जिंकणार नाही असे वाटत असले तरी, निवडणुका लढणाराच फायटर असतो. अशा प्रकारचा उमेदवार लोकांना आवडतो व दुसऱ्या प्रयत्नावेळी लोक अशा उमेदवारांना निवडून देतात. काही उदाहरणे म्हणून प्रसाद गावकर, गोविंद गावडे, माथानी साल्ढाणा, रवी नाईक, माधव बीर आदी अनेक आमदारांची नावे सांगता येतील. आयुष्यातील पहिली निवडणूक काही नेते हरलेच होते. काहीजण मग दुसऱ्यांदा निवडून आले, तर काहीजण तिसऱ्यांदा. काहीजण मंत्री, आमदार होऊन मग पराभूत झाले व पुन्हा जिंकून आले. 

रवी नाईक १९८० च्या निवडणुकीत फोंड्यात मगो पक्षाच्या तिकिटावर पराभूत झाले होते. प्रसाद, गोविंद गावडे, किरण कांदोळकर हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक पराभूत झाले होते. पण ते हरले तरी, त्यांनी आपला प्रभाव दाखवून दिला होता. खूप मते मिळवली होती. १९८० साली फोंड्यात जॉईल्द आगियार अर्स काँग्रेसवर जिंकले तेव्हा आगियार यांना ६७०० मते मिळाली होती. रवींना त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे ६००९ मते प्राप्त झाली होती. तेच रवी मग दहा वर्षांनी राज्यात मुख्यमंत्री झाले. मनोहर पर्रीकर आयुष्यातील पहिली लोकसभा निवडणूक हरले होते. विधानसभा निवडणूक ते जिंकले व पुढे तेच पर्रीकर सहा वर्षांत मुख्यमंत्री झाले. माथानी साल्ढाणा तर अनेकदा हरायचे. पण, नंतर ते मंत्री झाले. अनुभवातून खरे व गंभीर खाचखळगे राजकारणी शिकतात. म्हणून पुढे ते यशस्वी होतात. आपण पराभूत होणार हे ठाऊक असून देखील रिंगणात उतरतात व धाडसाने प्रतिस्पर्ध्याला टक्कर देऊ पाहतात, अशा उमेेदवारांना पुढे संधी मिळतेच. भाऊसाहेब बांदोडकर यांनाही कदाचित पहिल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीवेळी भीती वाटत होती. लोकप्रियता असली तरी, आपण जिंकणार की नाही याविषयी कदाचित शंका असावी व त्यामुळे ते पहिली निवडणूक लढले नव्हते, मग त्यांनी पोटनिवडणूक जिंकली हा भाग वेगळा.

गोवा मुक्तीनंतर झालेल्या काही निवडणुकांमध्ये मोठमोठी प्रस्थे पराभूत झाली होती. काही खाण मालक, अन्य उद्योगपती हरले होते. म्हणून काही निवडणूक लढवायचीच नाही? थेट पहिल्याच प्रयत्नात जिंकलो, असे सर्वांबाबत होत नसते. १९८४ साली गोवा काँग्रेसच्या तिकिटावर विली डिसोझा हरले होते. त्यावेळी मगोपचे श्रीकांत मळीक हे विलींविरुद्ध कळंगुटमध्ये जिंकले होते. मळीक पुढे सीएम वगैरे झाले नाही, पण विली डिसोझा झाले. लांब पल्ल्याचे घोडे हे पराभवाने खचत नसतात. उत्पल पर्रीकर यांनाही कदाचित ह्या इतिहासाची कल्पना असावी. त्यामुळेच ते माघार घेणार नाहीत, याचा पूर्ण विश्वास पणजीतील सध्याच्या उत्पल समर्थक कार्यकर्त्यांना आहे. चर्चिल आलेमांव हे १९८४ च्या निवडणुकीत बाणावली मतदारसंघात पराभूत झाले होते. माँत क्रुझ जिंकले होते, पण चर्चिलना साडेपाच हजार मते त्यावेळीही मिळाली होती, हे लक्षात घ्यायला हवे. तेच चर्चिल पुढे ९०च्या दशकात १९ दिवस तरी मुख्यमंत्री झाले. नंतर अनेकदा मंत्रीही झाले. माँत क्रुझ मुख्यमंत्री कधी झाले नाही. १९८० साली सुरेंद्र सिरसाट म्हापशात पराभूत झाले होते. श्यामसुंदर नेवगी तेव्हा  जिंकले होते. शशिकलाताई त्यावेळी हरल्या होत्या. 

संघर्ष करणारे नेते एकदा पराभूत झाले तर पुढे जिंकत असतात. रोहन खंवटे पणजीत नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी एका वार्डात पराभूत झाले होते. त्यावेळी ताळगावचे स्व. सोमनाथ जुवारकर हे पणजीतही बडे प्रस्थ होते. मात्र खंवटे पुढे विधानसभेत दोनवेळा पोहोचले व राज्याचे मंत्रीही झाले. पर्वरी मतदारसंघ त्यांनी पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणला आहे. विनोद पालयेकर यांचे बंधू, स्व. उदय पालयेकर यांचे बंधू शिवोली मतदारसंघात हरत होते. पण विनोद मात्र पहिल्याच प्रयत्नात जिंकले. राजकीय स्थिती कधी अनुकूल तर कधी प्रतिकुल होत असते. 

उत्पल यावेळी जर पणजीत अपक्ष देखील उभे राहिले तरी, बाबूश मोेन्सेरात यांना घाम काढला जाऊ शकतो. दोन महिन्यांपूर्वी पणजीत तशी स्थिती नव्हती, आता भावनिक वातावरण तयार होऊ लागलेय. तुम्ही पर्रीकरांच्या मुलाला तुच्छ लेखता म्हणजे काय? असा प्रश्न पणजीतील काही ख्रिस्ती मतदार भाजपच्या काही नेत्यांना विचारतात तेव्हा आश्चर्य वाटते. 

विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे विधानसभेची पहिली पोटनिवडणूक पराभूत झाले होते, पण नंतर जिंकून ते सभापती झाले व नंतर मुख्यमंत्रीही झाले. लक्ष्मीकांत पार्सेकरांचे तर डिपॉझिटही पहिल्या दोन निवडणुकांत जप्त झाले होते. पण, तेही नंतर मंत्री, मुख्यमंत्री झाले. हा सगळा ताजा राजकीय इतिहास राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनीही विविध दृष्टीकोनांतून अभ्यासायला हवा. त्याचे अधिक तपशीलाने विश्लेषण व्हायला हवे. अचानक आले, जिंकले व मंत्री, सीएम झाले असे होत नाही. ठोकर खावी लागते. श्रीपाद नाईक मडकईत हरल्यानंतर जे खासदार झाले, ते अजून खासदारकी व केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवत आहेत. १९८९ साली दिगंबर कामत आयुष्यातील पहिली विधानसभा निवडणूक लढले होते. त्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर मडगावमध्ये उभे राहूनही कामत यांना पराभव पाहावा लागला होता. त्या निवडणुकीत बाबू नायक यांनी पाचशे मतांच्या फरकाने कामत यांना पराभवाचे पाणी पाजले होते. स्व. बाबू नायक अपक्ष लढले होते. कामत तेव्हा वयाच्या पस्तीशीत होते. तेच कामत पुढे २००७ साली गोव्याचे मुख्यमंत्री झाले. कामत यांच्या स्वभावात गोडवा आहे. गर्व नाही. सीएम झाले तरी ते अहंकारी झाले नव्हते. त्यामुळेच ते सातत्याने निवडून आले. कुणाही नव्या राजकारण्याने यशस्वी होण्यासाठी कामत यांचा निदान हा गुण तरी स्वीकारायला हवा. मनोहर पर्रीकर यांचा स्वभाव वेगळा होता. विली डिसोझा हे वेगळे होते. दयानंद नार्वेकर तर नमणारेच नव्हते. १९८९ साली हळदोणेत नार्वेकरांना लोकांनी पराभूत करून रत्नाकर चोपडेकर यांना मगोपच्या तिकिटावर निवडून दिले होते. नंतरच्या काळात नार्वेकरांनी पुन्हा मुसंडी मारून अनेक वर्षे मंत्रीपदही अनुभवले. गुरुदास गावस हे काँग्रेसतर्फे पूर्वीच्या पाळी मतदारसंघातून हरले होते. पण, नंतर ते आमदार झाले. प्रवीण झांट्ये यांनीही तोच अनुभव घेतला आहे.

निवडणुका हरणे म्हणजे सगळे काही संपले असे असत नाही. किंबहुना हरणारेच जिंकतात व मुख्यमंत्री देखील होतात. सासष्टी तालुक्यात अनेक राजकारणी प्रथम विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. काही उमेदवार मात्र निवडणुकीवेळी फक्त सेटिंग करण्यासाठी उभे राहत असतात. त्यांना जिंकण्याची इच्छा असत नाही. काहीजणांना दुसरा एखादा प्रस्थापित नेता किंवा मंत्री आपल्या विरोधकांची मते फोडण्यासाठी रिंगणात उतरवत असतो. उत्पल किंवा अन्य राजकारणी हे अशा प्रकारचे राजकारण करण्यासाठी आलेले नाहीत. पूर्वी काँग्रेसचे काही उमेदवार जिंकण्यासाठी तिकीट घेतच नव्हते. केवळ मिरवण्यासाठी व पडद्याआडून सेटिंग करण्यासाठी तिकीट घेत होते. त्यामुळेच लोकांचा विश्वास गेला. काँग्रेसला यावेळी जिंकू किंवा मरूच्या इर्षेने लढण्याची शेवटची संधी आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने यावेळी ज्यांना तिकीट दिले आहे, त्यापैकी दोघा-तिघांची नावे पाहिल्यानंतर राजकीय अभ्यासकांना हसावे की रडावे, ते कळत नाही. वाळपईपासून सुरुवात करावी लागेल. पणजीत म्हणे एल्वीस गोम्स यांना तिकीट देण्याची स्वप्ने काँग्रेसच्या नेत्यांना पडतात. डोके ठिकाणावर आहे ना असे विचारावेसे वाटते. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण