नीलेश शेटकर ल्ल पणजी बंदी असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातून प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्याने स्थानिक मूर्तीकारांसह पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक ठिकाणी ‘पीओपी’च्या गणेशमूर्तींची खुलेआम विक्री सुरू असून कारवाईची मागणी होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने राज्यातील काही प्रमुख बाजारपेठा तसेच उपनगरांत विक्रीसाठी ठेवलेल्या गणेशमूर्तींची पाहणी केली असता, बहुतेक ठिकाणी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती दिसून आल्या. काही ग्रामीण भागातही या मूर्तींची दुकाने काहींनी थाटली आहेत. पर्यावरणीय प्रश्न निर्माण होत असल्याने राज्यात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विकण्यास राज्य सरकारने बंदी लादली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही बंदी असली तरी दरवर्षी चतुर्थीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पान २ वर)
‘पीओपी’ गणेशमूर्ती दाखल
By admin | Published: September 08, 2015 1:57 AM