पणजी - गोव्यात येणारे पर्यटक आणि समुद्रात जाणारे अन्य घटक यांनी येत्या 72 तासांत गोव्याच्या समुद्रात जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा सरकारने नेमलेल्या दृष्टी ह्या जीवरक्षक संस्थेच्या यंत्रणेने दिला आहे. अरबी समुद्राच्या नैरुत्य दिशेने मेणूकू नावाचे वादळ घोंगावू लागले असल्याने समुद्रकिना:यावरील हवामानावर व समुद्रातील स्थितीवर त्याचा प्रभाव पडू शकेल. त्यामुळे कुणी पुढील 72 तास समुद्रात न जाणो योग्य ठरेल, असे दृष्टी संस्थेचे म्हणणो आहे.
वादळामुळे भरतीवेळी मोठय़ा लाटा किना:यावर येण्याची शक्यता आहे. किनारपट्टीतील सखल भागात अशी शक्यता जास्त प्रमाणात आहे, असे जीवरक्षकांचे व्यवस्थापन करणा:या दृष्टी संस्थेचे म्हणणो आहे. मोठय़ा वेगाचे वारे पुढील 72 तास समुद्रावर वाहू शकते. समुद्रात जे उतरत असतात त्यांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे व शक्यतो समुद्रात उतरूच नये असा सल्ला पर्यटकांना व इतरांना दृष्टी संस्थेने दिला आहे.
दरम्यान, सध्या पर्यटन मोसम असल्याने व उकाडा असह्य होत असल्याने लाखो पर्यटक सागरकिना:यावर आलेले आहेत. या दिवसांत पोहण्यासाठी तसेच जलक्रिडा करण्यासाठी बरेच पर्यटक समुद्रात उतरत असतात. मिरामार, कांदोळी, कळंगुट, बागा, वागातोर, मांद्रे, मोरजी, आश्वे, सिकेरी, हरमल असा सारा सागरकिनारा पर्यटकांनी फुललेला आहे. दृष्टी यंत्रणोकडे सुमारे सहाशे जीवरक्षक असून 1क्5 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीत जीवरक्षकांची पथके लक्ष ठेवून आहेत. किना:यावर अगोदरच बंदोबस्त वाढलेला आहे. गेल्या महिन्यात उत्तर गोव्यातील समुद्रात बुडताना दोघा व्यक्तींना जीवरक्षकांनी वाचवले आहे.