लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: भारतीय डाक विभागातर्फेराबविल्या जाणाऱ्या विमा योजनेवर ३९६ रुपयांत १० लाखांचे विमा कवच दिले जात आहे. गोव्यातही या विम्याचा मोठ्या प्रमाणात लोक लाभ घेत आहेत. अनेक लोक वार्षिक ३९६ रुपये भरून अपघात विमा करतात.
१० लाखांचा विमा ३९६ रुपयांत सध्या लोक अपघात विमा मोठ्या प्रमाणात काढत आहेत. अनेक बँकांनीही अशा अपघात विमा योजना सुरू केल्या आहेत. पण, भारतीय डाक विभाग हा केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने लोक मोठ्या विश्वासाने हा विमा काढत आहेत. इतर काही खासगी कंपन्यांच्या तुलनेत याकडे अधिक ओढा आहे.
विमा कसा काढाल?
अनेक लोकांना या विम्याविषयी माहिती नसते. त्यामुळे लोक जास्त हा विमा काढत नाहीत. आता डाक विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात आली आहे. विभागाचे कर्मचारी याविषयी लोकांना माहिती देत आहेत. जर लोकांना हा विमा काढायचा असेल तर जवळच्या डाक कार्यालयात जाऊन या योजनेविषयी माहिती मिळू शकते. तसेच ऑनलाइन वेबसाइटवर या विमाविषयी माहिती देण्यात आली आहे.
अनेकांना मिळतो लाभ
गोव्यातून अनेक लोक आपला ३९६ रुपये वार्षिक रक्कम भरुन १० लाखांचा विमा काढत आहेत. डाक विभागाचे कर्मचारी अनेक खासगी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन कर्मचायांचा विमा काढत आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिक लोकही आपला विमा काढतात. आतापर्यंत अनेकांना या योजनेचा लाभ झाला आहे. अपघातग्रस्त झालेल्यांना पैसाही मिळाला आहे. त्यामुळे अनेक लोक या योजनेचा लाभ घेतात. ही योजना देशभर सुरु आहे.
गोव्यात या विम्याविषयी जनजागृती केली जात आहे. अनेक लोकापर्यंत डाक विभागाचे कर्मचारी पोहचत आहेत. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात लोक हा विमा काढतात. - राजेश मडकईकर, पणजी डाक विभाग अधिकारी