नारायण गावस
पणजी - राजधानी पणजी अजूनही स्मार्ट सिटीची कामे संपलेली नाही वाहनचालकांना होणारा त्रास संपलेला नाही अशा स्थितीत पणजी महानगर पालिकेने शहरात पें पार्किंग शुल्क आकारणी पुन्हा सुरु केल्याने पणजीवासियांनी तसेच पणजीत येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे पणजी स्मार्ट सिटीची कामे पूर्ण होईपर्यत पे पार्किंग आकारु नये असे पणजीवाकरांकडून मागणी केली जात आहे.
राजधानीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीतील बहुतांश रस्ते खोदले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने पार्क करायला मिळत नव्हती यासाठी पणजी महानगर पालिकेने गेले दाेन महिने पणजीतील पे पार्किंग बंद ठेवली हाेती. पण आता पणजीतील बहुतांश रस्त्यांचे हाॅटमिक्सींगचे काम पूर्ण झाल्याने पणजी महानगर पालिकेचे महापौर राेहित मोन्सेरात यांनी १ जून पासून हे पे पार्किंग पुन्हा सुरु केली आहे. तसेच पाहिल्यास पणजीत अजूनही बहुतांश रस्ते खाेदलेले आहेत. अनेक ठिकाणी मातीचे ढीगार आहेत. वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही पे पार्किंग आणखी काही दिवस पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे.
राजधानीत वाहतूकीला शिस्त यावी पणजीत होणारी वाहतूक काेंडी कमी व्हावी यासाठी पणजीत महानगर पालिकेने राजधानीत पे पार्किंग सुरु केली आहे. पण पणजी स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याने वाहतूक कोडी ही नित्याची झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते खोदले असल्याने वाहनांना व्यवस्थित पार्किंग करायला जागाच मिळत नाही. लोकांना पे पार्किगच त्रास जाणवत होता. म्हणून फक्त दाेन महिने पे पार्किंग बंद करुन आता पुन्हा सुरु केल्याने लाेक नाराज आहे. स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होईपर्यंत राजधानीत पे पार्किंग घेऊ नये असे काही जणांचे मत आहे.
पणजी स्मार्ट सिटीचे काम ९० टक्के झाले म्हटले तरी अजून काम पूर्ण झालेली नाही यातच आता पे पार्किंग करुन पणजीकरांच्या त्रासात आणखी पाडणार आहे. पणजीचे आमदार आणि मनपाच्या महापौरांनी कुणाची तरी आर्थिक भर करुन देण्यासाठी ही घाईगडबीडीत पे पार्किंग सुरु केली आहे. यात पणजी करांना विश्वासात घेतलेले नाही, असे शैलेद्र वेलिंगकर यांनी सांगितले.
पणजीतील स्मार्ट सिटीची कामे अजून अपूर्ण आहे त्यामुळे पणजी महानगर पालिकेने पे पार्किंग सुरु करुन नये असे सांगितले. खोदकामुळे वाहनाचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत पे पार्किंग आकारणे चुकीचे आहे असे उत्पल पर्रीकर म्हणाले.