पणजी: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजे बाबतचे देखभालीची कामे करण्यासाठी पणजीतील विविध भागांमध्ये २९ ते ३१ जून दरम्यान वीज पुरवठा खंडीत केला जाईल असे वीज खात्याने कळवले आहे.
या काळात लोकांनी सहकार्य करावे असे आवाहनही खात्याने केले आहे. खात्याने जाहीर केल्यानुसार गुरुवार ३० मे रोजी आल्तिनो येथील सरकारी वसाहत परिसर, सती मंदिर व आजूबाजूच्या परिसरात सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.३० वाजे दरम्यान वीज पुरवठा खंडीत केला जाईल.
३० रोजी आल्तिनो येथील एफ टाईप सरकारी क्वार्टस,लॅटीनो स्प्लॅंडर, हनुमान मंदिर, न्यायधिशांचे बंगले, बांदोडकर हाऊस व आजूबाजूच्या परिसरात दुपारी २.३० ते ५ वाजे दरम्यान वीज पुरवठा खंडीत केला जाईल. याशिवाय त्या दिवशी मळा येथील जयराम कॉम्प्लेक्स, गोविंद कामत इस्पितळ, उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरण (एनजीपीडीए)कार्यालय , सिनारी पेट्रोल पंप व परिसरात सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजे दरम्यान वीज नसेल.
तर शुक्रवार ३१ मे रोजी जुने सचिवालय लिबर्टी शोरुम, मणेरकर दुकान, हॉटेल क्राऊन, हॉटेल विनंती, व्यवसायिक कर खाते व आजूबाजूच्या परिसरात सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजे दरम्यान वीज खंडीत असेल. तसेच पणजी पाटो, कदंब बसस्थानक परिसरात सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजे दरम्यान वीज नसेल असे खात्याने नागरिकांना कळवले आहे.