पणजी : म्हादई पाणीप्रश्नी गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिलेला शब्द केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर निश्चितच पाळतील, असा विश्वास गोवा भाजपने शनिवारी येथे व्यक्त केला.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन म्हादई पाणीप्रश्नी सरकारविरुद्ध वातावरण तापविणो सुरू केले आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कळसा भंडुरा प्रकल्पासाठी म्हादई नदीचे पाणी वळविण्यास कर्नाटकाला मंजुरी देणारे पत्र दिलेले आहे.
गोवा सरकारने त्या पत्रस आक्षेप घेतला होता. त्यानंतर दहा दिवसांत या पत्रविषयी काय ते स्पष्टीकरण देऊ, असे जावडेकर म्हणाले होते. याविषयी पत्रकारांनी विचारले तेव्हा सावईकर म्हणाले, की म्हादई नदीचे पाणी वळवू नये अशी गोवा भाजपचीही भूमिका आहे. म्हादई पाणीप्रश्नी गोव्याचे हितरक्षण व्हायला हवे. पाणी वळविण्यास आमचा असलेला विरोध आम्ही यापूर्वीच्या काळात अनेकदा केंद्राला कळविला आहे.
सावईकर म्हणाले, की जावडेकर हे केंद्रातील भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांनी जो शब्द दिला आहे, तो शब्द ते निश्चितच पाळतील असा आम्हाला विश्वास आहे. वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेल्या पत्रसंबंधी स्पष्टीकरण देणारे पत्र जारी केले जाईल, असे जावडेकर यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सांगितले आहे. जावडेकर यांनी केवळ गोव्याच्या एका मुख्यमंत्र्यांनाच आश्वासन दिलेले नाही तर ते सर्वपक्षीय शिष्टमंडळासमोर बोलले आहेत. विजय सरदेसाई देखील त्या शिष्टमंडळात होते. मुख्यमंत्री सावंत हे जावडेकरांशी नुकतेच बोलले आहेत. जावडेकरांकडून स्पष्टीकरणाचे पत्र येईल.
दरम्यान, इफ्फीच्या उद्घाटनावेळी जावडेकर गोव्यात येतील तेव्हा तुम्ही त्यांना भेटून म्हादईप्रश्नी बोलणार काय असे पत्रकारांनी विचारले असता, सावईकर यांनी नकारार्थी उत्तर दिले. हा विषय राज्य सरकार हाताळत आहे, असे ते म्हणाले.
राफेलप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ामुळे केंद्र सरकारचा व्यवहार स्वच्छ होता हे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी खूप अपप्रचार केल्याबाबत देशाची व पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी अशी मागणी सावईकर यांनी केली. स्वर्गीय मनोहर र्पीकर यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न गांधी यांना केला होता, असे सावईकर म्हणाले.