पणजी - गोव्यात होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी आता अंतिम टप्प्यात येऊ लागली आहे. सोहळ्याचं उदघाटन फक्त नऊ दिवसांवर येऊन ठेपले आहे. अभिनेता शाहरूख खानच्या उपस्थितीत इफ्फीचा उद्घाटन सोहळा होणार अशल्याती चर्चा सध्या आहे. त्याविषयी अंतिम निर्णय अजून झालेला नाही. एनएफडीसी आणि गोवा सरकारची मनोरंजन संस्था मिळून इफ्फीचे आयोजन करत आहे. दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे. इफ्फीसाठी जगभरातील सिनेमांची निवड सध्या केली जात आहे. येत्या चार-पाच दिवसांत त्याविषयी घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळाली. इफ्फीत गोमंतकीयांसाठी असलेल्या खास प्रिमीयर विभागात यंदा चार स्थानिक सिनेमांची निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रीग्ज यांना गोवा मनोरंजन संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेष व इफ्फी फेस्टीव्हल एक्झीक्युटीव्हसाठी खास टि-शर्ट डिझाईन करण्याचे काम दिले गेले आहे. नवोदित चित्रपट दिग्दर्शकांसाठी यावेळी स्किल स्टुडिओ उभारला जाईल व तिथे सिनेमाविषयक विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. ही माहिती मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांच्याकडून मिळाली.
बायोस्कोप हे यावेळच्या इफ्फीचे एक वैशिष्ट्य असेल. पूर्वी इफ्फीस्थळीच पण बालोद्यानात जिथे किंगफिशर विलेज उभी केली जात असे, तिथे बायोस्कोर विलेज उभी केली जाईल. तिथे मुलांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे असतील व बालचित्रपट तिथे प्रदर्शित केली जातील. जे पालक व मुले इफ्फीचे प्रतिनिधी झालेले नाहीत, त्यांना हे सिनेमे पाहून इफ्फीचा फिल अनुभवता येईल. बायोस्कोप विलेजचे बॉलिवूडच्या कलाकारांकडून उदघाटन केले जाणार आहे.देश- विदेशातील मिळून सुमारे पाच हजार प्रतिनिधींची नोंदणी सध्या इफ्फीसाठी झालेली आहे. राजधानी पणजी सध्या इफ्फीच्या तयारीत व्यस्त आहे. शहर सजू लागले आहे. इफ्फीचे उद्घाटन आणि समारोप सोहळा बांबोळी-दोनापावल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे. इफ्फीस्थळी एक कट्टा उभारून तिथे बॉलिवूडच्या व मराठी चित्रपटाशीनिगडीत कलाकारांच्या मुलाखती आयोजित केल्या जातील. मनोरंजन संस्थेसमोर असलेल्या समुद्रकिनाऱ्यांकडे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार डॉ. सुबोध केरकर हे चित्रकृती उभ्या करणार आहेत.
पणजीत सध्या रंगकाम, प्रमुख मार्ग स्वच्छ करणो, इफ्फीस्थळी डागडुजी करणो अशी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. 3क् रोजी इफ्फीचा समारोप होणार आहे. तथापि, सगळी यंत्रणा सध्या 2क् रोजी सायंकाळी होणार असलेल्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्य़ाच्या तयारीत गुंतली आहे. जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर असे काही कलाकार इफ्फीत सहभाग घेणार आहेत.