शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

आशियाई ॲालिंपिकसाठी सुविधांवर १०० लाख कोटींपेक्षा अधिक खर्च करण्याची तयारी

By किशोर कुबल | Published: October 26, 2023 8:47 PM

मोदीजींची घोषणा : २०३६ मध्ये स्पर्धा भरवण्याचा निर्धार

किेशोर कुबल

पणजी : २०३६ मध्ये आशियाई ॲालिंपिक स्पर्धा आयोजनासाठी भारत तयारी करीत असून त्यासाठी शंभर लाख कोटी रुपये खर्चुन साधन सुविधा उभारु. त्याआधी २०३० साली युवा ॲालिंपिक स्पर्धाही देशात होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी यानी केली. गोव्यात फातोर्डा येथे पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मोदीजींच्या हस्ते ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले.

मोदीजी म्हणाले की, ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाने गोव्याच्या पर्यटनाला तसेच येथील आर्थिक वृध्दीला मोठा लाभ होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गोव्यात ज्या क्रीडा सुविधा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे भविष्यात गोव्यातून देशाला निश्चितच अव्वल खेळाडू मिळतील.

 ३१ रोजी ‘माय भारत’ अभियान

येत्या ३१ रोजी ‘माय भारत’ अभियानाची सुरवात करु असे जाहीर करताना मोदीजी म्हणाले की, भारत आज प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व वेगाने प्रगती करीत आहे. देशातील युवा वर्गात अभूतपूर्व असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. ३१ रोजी ‘रन फॉर युनिटी’ दौडीत देशभरातील युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मोदीजींनी केले.     मोदीजींचे ‘स्वयंपूर्ण फेरी’तून अभिवादन - मुख्यमंत्र्यांकडून घुमट वाद्य भेट

मोदीजींनी सजवलेल्या रथातून फातोर्डा येथील स्टेडियमवर फेरी मारली व उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. या प्रसंगी त्यांच्यासोबत रथावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हे होते. रथावर ‘स्वयंपूर्ण फेरी’ असे लिहिले होते. उपस्थित गोमंतकीयांनी मोदीजींचे मोबाइलची टॉर्च पेटवून आगळेवेगळे स्वागत केले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोदीजींना गोव्याची कुणबी शाल व पारंपरिक घुमट वाद्य भेट दिले.गोव्यात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. ९ नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार असून देशभरातील १० हजारांहून अधिक खेळाडू २८ ठिकाणी ४३ पेक्षा जास्त क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतील.

केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांनी देशभरात चालू वर्षी १ हजारहून अधिक खेलो इंडिया केंद्रे उघडली जातील, असे स्पष्ट केले.