शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

गोव्यात सुरू आहे नाताळ सणाची जोरदार तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 10:18 AM

दीपावली उत्साहात पार पडल्यानंतर गोव्याला आता ख्रिसमसचे वेध लागले आहेत. नाताळ सणानिमित्तची तयारी जोरात सुरू झाली आहे.

पणजी : दीपावली उत्साहात पार पडल्यानंतर गोव्याला आता ख्रिसमसचे वेध लागले आहेत. नाताळ सणानिमित्तची तयारी जोरात सुरू झाली आहे. विशेषत: गोमंतकीय ख्रिस्ती बांधवांनी सणानिमित्ताने धावपळ चालवली आहे. चर्चच्या इमारतीही सजू लागल्या आहेत. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात ख्रिस्ती धर्मिय बांधवांची लोकसंख्या ही 23 टक्के आहे. धार्मिक सलोखा जपण्याबाबत गोवा राज्य देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. गोव्यातील हिंदू धर्मियही नाताळ सणात सहभागी होतात आणि ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देतात.

नाताळानिमित्त घरात रंगकाम करणे, घरे सजविणे, घराभोवतीचा परिसर स्वच्छ करणे, परदेशातून आणि मुंबईसारख्या ठिकाणाहून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठीची तयारी करणे अशा कामांमध्ये सध्या गोव्यातील ख्रिस्ती बांधव व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. ख्रिस्ती महिलाही नाताळानिमित्त विविध प्रकारचे खाद्यपदार्थ करण्याच्या कामात सध्या मग्न आहेत. एक प्रकारची लगीनघाईच सुरू असल्याचा अनुभव ख्रिस्ती धर्मियांच्या घरांमध्ये येत आहे. जिंगल बेल आणि मेरी ख्रिसमसचा माहोल यापुढे निर्माण होणार असल्याची चाहुल देणारे वातावरण आता गोव्यात तयार होत आहे.

गोव्यातील सासष्टी, बार्देश, तिसवाडी आणि मुरगाव या तालुक्यांमध्ये जास्त संख्येने ख्रिस्ती कुटुंबे राहतात. दीपावलीनिमित्ताने हिंदू घरे जशी सजलेली असतात व आकाश कंदिल आणि रोषणाई केली जाते तशीच सजावट नाताळानिमित्ताने ख्रिस्ती घरांकडून केली जाते. घरासमोर रंगीबेरंगी नक्षत्रे लावून शोभा वाढवली जाते. हॅपी ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गोव्याचे आर्चबिशपदेखील डिसेंबरमध्ये आल्तिनो येथील बिशप पॅलेसच्या ठिकाणी सर्वधर्मिय महनीय व्यक्तींसाठी चहापानाचे आयोजन करतात. त्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री सहभागी होतात.

गोव्यात नाताळाला आगमन होण्यापूर्वी जगप्रसिद्ध सेंट झेवियरचे फेस्त पार पडते. लाखो पर्यटक देखील या फेस्तावेळी जुनेगोवे येथील चर्चेसना भेट देतात. नोव्हेंबरच्या अखेरीस नोव्हेना म्हणजेच प्रार्थनेला आरंभ  होणार आहे.

टॅग्स :goaगोवा