विशांत वझे, डिचोली: आधुनिक जगात विज्ञान ,गणित,तंद्रज्ञान,अभियांत्रिकी विभागात मोठी क्रांती घडतं असल्याने प्राथमिक स्तरापासून मुलांना या विषयाची गोडी लागावी यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न असून त्याच उद्देशाने. गोव्यातील पहिल्या स्टेम ले ब सुरू केला आहे.या अंतर्गत मुलांना कठीण वाटणारे गणित ,विज्ञान विषय आगामी काळात सोपे होणार असून या विषयांची त्यांच्या मनातील भीती ही दूर होणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.गृहनिर्माण वसाहत साखळी येथील जगन्नाथ राव जोशी सरकारी प्राथमिक शाळेत स्टेम लॅब चे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष रश्मी देसाई,उपनगराध्यक्ष आनंद काणेकर,सिद्धी पोरोब, सियस आरचे गुरुराज,विवेक आदी उपस्थित होते. मुलांना गणित विज्ञान या विषयाची अकारण भीती निर्माण होत असल्याने ते इतर विषय निवडत असतात आज तुम्हाला सर्वोत्तम शिक्षण मिळवताना स्पर्धेत राहण्यासाठी आधुनिक शिक्षण गरजेचे असून प्राथमिक पातळीवर या विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करण्याची संधी तसेच त्यानंतर एक वेगळा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होईल व विविध विषयांची असलेली अनामिक भीती ही दूर होणार असून त्या दृष्टीने हा स्टेम लॅब महत्वपूर्ण व विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.
विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी विद्यार्थी कौशल्य विकास तसेच विज्ञान ,तंत्रज्ञान, गणित या क्षेत्रात रुची निर्माण होताना भविष्यात अनेक चांगले तंतज्ञान विकसित करणारी पिढी घडेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील सर्व शाळांतील मुलांना या लॅब च्या माध्य मातून विशेष शिक्षण व रुची निर्माण होईल असे डॉ सावंत म्हणाले.राज्य सरकार शैक्षणिक क्षेत्रात अनेक नवे बदल घडवत असून त्या द्वारे सर्वोत्तम दर्जेदार तसेच उद्योग व्यवसायाला पूरक असे कौशल्य विकसीत करणारे शिक्षण गरजेचे असल्याने तश्या प्रकारे नियोजन करीत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.